Home देश Soanm Wangchuk : मोदी सरकारविरुद्ध उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी चक्क आता केलं मोदी सरकारचं कौतुक; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Soanm Wangchuk : मोदी सरकारविरुद्ध उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी चक्क आता केलं मोदी सरकारचं कौतुक; जाणून घ्या नेमकं काय घडलं

0
Soanm Wangchuk : मोदी सरकारविरुद्ध उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी चक्क आता केलं मोदी सरकारचं कौतुक; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Soanm Wangchuk) यांनी केंद्र सरकारच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे. परीक्षांमधील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकाचं वांगचुक यांनी स्वागत केलं.

नीट परीक्षेतील पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत सोनम वांगचुक (Soanm Wangchuk) यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर २६ दिवस उपोषण केलं होतं. या आंदोलनानंतर सरकारने परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पावले उचलण्याचं आश्वासन दिलं होतं. आता संसदेत विधेयक मांडण्यात आल्यानंतर वांगचुक यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

https://prahaar.in/2026/07/29/parliament-monsoon-session-2026-day-8-live-updates-anti-exam-paper-leak-law-to-be-presented-today/

‘फक्त परीक्षा नव्हे, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा हवी’

सोनम वांगचुक (Soanm Wangchuk) यांनी म्हटलं की, परीक्षांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत. मात्र, सुधारणा केवळ परीक्षा पद्धतीपुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणणाऱ्या असाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “परीक्षांमधील सुधारणांबाबत संसदेत विधेयक आणण्यात आलं याचा आनंद आहे. या सुधारणा पुढे शिक्षण व्यवस्थेतही सकारात्मक बदल घडवतील, अशी आशा आहे,” असं वांगचुक यांनी सांगितलं.

उपोषणानंतर वंदे भारतमधून केला प्रवास :

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक हे आंदोलनाचा प्रमुख चेहरा ठरले होते. १८ जुलै रोजी त्यांना आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. (Soanm Wangchuk)

यानंतर गुरुग्राम येथील रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर वांगचुक यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली ते श्रीनगर सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनमधून पहिल्यांदाच प्रवास केला. या प्रवासादरम्यान चिनाब ब्रिज पाहण्याची इच्छा पूर्ण झाल्याचं त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितलं आणि भारतीय रेल्वेच्या प्रगतीचं कौतुक केलं. (Soanm Wangchuk)

https://prahaar.in/2026/07/29/birth-and-death-registration-rules-set-to-become-stricter-will-court-permission-be-required-for-registration-after-two-years/

सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर संपवलं होतं उपोषण : 

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याआधीच सरकारकडून काही आश्वासनं मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण संपवलं होतं. आता परीक्षा सुधारणा विधेयकावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू झाली आहे. वांगचुक यांनी सरकार आणि आंदोलकांमध्ये संवाद कायम ठेवण्याचं आवाहन करत, देशातील युवा पिढीमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. (Soanm Wangchuk)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here