Home ब्रेकिंग न्यूज Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; ट्रॅफिकच्या जाचातून मिळणार दिलासा

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; ट्रॅफिकच्या जाचातून मिळणार दिलासा

0
Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; ट्रॅफिकच्या जाचातून मिळणार दिलासा

माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम या १३ किमी टप्प्याला सुरक्षा मंजुरी; पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून मेट्रो धावणार

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) परिसरातील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो मार्ग ३) या मार्गावरील पहिली ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, त्यामुळे मेट्रो सेवा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या प्रकल्पामुळे आयटी कर्मचाऱ्यांसह दररोज प्रवास करणाऱ्या हजारो पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. (Pune Metro)

या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क थेट शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय परिसराशी जोडले जाणार आहे. सध्या वाहतूक कोंडीमुळे तासन्तास लागणारा प्रवास मेट्रोमुळे कमी वेळात पूर्ण करता येणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. (Pune Metro Trail Run)

https://prahaar.in/2026/07/30/good-news-for-harbour-line-commuters-15-coach-local-trains-will-soon-run-at-gtb-nagar-station/

तब्बल ८,३१३ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) हा सुमारे १३ किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. (Pune Infrastructure)

हिंजवडी ते शिवाजीनगर या संपूर्ण मार्गावर एकूण २३ मेट्रो स्थानके असणार आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यात १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार असून, सुरुवातीला या स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. (Pune News)

पहिली ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता उर्वरित तांत्रिक प्रक्रिया आणि अंतिम परवानग्या पूर्ण करून ही मेट्रो सेवा लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. (Public Transport Pune)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here