मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील एका लोकप्रिय मुलांच्या प्ले झोनमध्ये दिलेल्या पास्तामध्ये झुरळ आढळल्याचा गंभीर आरोप एका वृत्तवाहिनीतील महिला पत्रकाराने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आस्थापनाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांच्याकडे केली आहे. (Mumbai News)
एनडीटीव्ही प्रॉफिटमध्ये ब्युरो चीफ म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमी चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत दावा केला की, त्यांच्या मुलांनी पास्ता खाल्ल्यानंतर त्यातील एका सर्व्हिंगमध्ये झुरळ आढळले. तसेच बसण्याच्या जागेवरही अनेक मेलेली झुरळे दिसल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Lower Parel News)
https://prahaar.in/2026/07/30/good-news-for-pune-residents-first-trial-run-of-the-hinjawadi-shivajinagar-metro-successful-relief-from-traffic-woes-in-sight/
पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या मुलांनी पास्ता खाल्ल्यानंतर त्यात झुरळ आढळले. त्यांनी या परिस्थितीला “पूर्णपणे अस्वीकार्य” म्हटले असून, मुलांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा आरोपही केला आहे. (Crockroach in Pasta)
मात्र, या आरोपांची अधिकृत पातळीवर अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी होईपर्यंत हे दावे केवळ सोशल मीडियावरील आरोप म्हणूनच पाहिले जात आहेत. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
View this post on Instagram
राज्यभरात सुरु आहेत मोहीम
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) राज्यभरात अन्न सुरक्षा मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत, तपासणीत जिवंत झुरळे, माश्या, अस्वच्छता आणि अन्नाची अयोग्य साठवणूक उघडकीस आल्यानंतर, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच मुंबईतील अनेक नामांकित रेस्टॉरंट्स आणि क्लब किचनचे परवाने निलंबित केले आहेत.