Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekhar Bawankule : अभिजीत दीपकेंनी धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करावीत!

Chandrashekhar Bawankule : अभिजीत दीपकेंनी धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करावीत!

0
Chandrashekhar Bawankule : अभिजीत दीपकेंनी धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करावीत!
Chandrashekhar Bawankule

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान; जाणीवपूर्वक भाजपची बदनामी करू नये

मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान भाजपच्या नेत्यांकडून धमक्या आणि पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याचे आरोप केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, “दीपके यांना जर खरोखरच कोणी धमकी दिली असेल तर त्यांनी संबंधित व्यक्तीचे नाव उघड करावे. हवे असल्यास आम्ही त्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाई करू, परंतु ठोस पुराव्यांशिवाय भाजपची जाणीवपूर्वक बदनामी करू नये,” असा सल्ला दिला आहे.

https://prahaar.in/2026/07/30/world-class-convention-center-being-built-in-nagpur/

ठाणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. आंदोलनादरम्यान आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भाजपकडून धमक्या आल्याचा दावा दीपके यांनी केला होता. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, “भाजप (BJP) हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून एकट्या महाराष्ट्रात पक्षाचे १ कोटी ५१ लाखांहून अधिक प्राथमिक सदस्य आहेत. इतक्या मोठ्या संघटनेत कोणी त्यांना धमकी दिली किंवा पक्षाची ऑफर दिली, याबद्दल दीपके यांनी स्पष्टपणे नावे जाहीर करावीत. नाव न सांगता राजकीय हेतूने पक्षावर चिखलफेक करणे योग्य नाही.”

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे १० लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असून, एकट्या ठाणे जिल्ह्यात ७६ हजार कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/07/30/heavy-rain-expected-tomorrow-in-this-part-of-nashik-district/

फ्लॅट धारकांना मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’

– ठाणे आणि मुंबईतील बहुमजली इमारतींमधील प्रत्येक फ्लॅटधारकाला त्याच्या हक्काचे स्वतंत्र ‘प्रॉपर्टी कार्ड’ दिले जाईल.

– रेडी रेकनरचे दर अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शहरांमध्ये इमारतींचे ‘मायक्रो झोनिंग’ केले जाईल.

– वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांना आता स्वतंत्र सातबारा उतारा मिळणार असून, त्यामुळे त्यांना कृषी स्टॅक आणि पीक विम्यासारख्या सरकारी योजनांचा फायदा घेता येईल, अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली.

महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर भाष्य

स्थानिक पातळीवर महायुतीतील लोकप्रतिनिधींमध्ये असलेल्या मतभेदांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रगल्भ नेते असून, स्थानिक आमदार व पालकमंत्र्यांशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here