Home क्राईम Nagpur Crime : नागपूरमधील धक्कादायक घटना! जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; घरात घुसून तलवार-चाकूने तिघांवर वार

Nagpur Crime : नागपूरमधील धक्कादायक घटना! जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; घरात घुसून तलवार-चाकूने तिघांवर वार

0
Nagpur Crime : नागपूरमधील धक्कादायक घटना! जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; घरात घुसून तलवार-चाकूने तिघांवर वार

घरात घुसून सपासप वार केला; दाम्पत्य गंभीर जखमी, एकाचा मृत्यू 

नागपूर : नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात जुन्या वादातून एका व्यक्तीने घरात घुसून तलवार आणि चाकूने तिघांवर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पाहुणी म्हणून आलेल्या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू (Death) झाला असून पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नीळकंठराव तराळ असे आरोपीचे नाव आहे. तो पूर्वी धर्मपाल डहाट यांच्या घरी भाड्याने राहत होता. मोठ्या आवाजात रेडिओ लावण्याच्या कारणावरून दोघांमध्ये पूर्वी वाद झाला होता. त्याच वैमनस्यातून आरोपीने डहाट यांच्या घरात घुसून तलवार आणि चाकूने धर्मपाल डहाट, त्यांची पत्नी वनिता डहाट आणि घरी पाहुणी म्हणून आलेल्या संगीता राजू चौधरी यांच्यावर सपासप वार केले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

https://prahaar.in/2026/07/29/chitrakoot-rape-case-gang-rape-of-young-woman-preparing-for-neet-two-suspects-detained/

हल्ल्यात एकाचा मृत्यू

या हल्ल्यात संगीता चौधरी यांचा अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. तर धर्मपाल आणि वनिता डहाट गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवककर यांनी सांगितले की, आरोपीने जुन्या वादातून हा हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये आरोपी घरात प्रवेश करताना दिसत आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला नाही. उलट तो घरातच शांत बसला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here