Home ब्रेकिंग न्यूज Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा महासागर; मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा महासागर; मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी

0
Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा महासागर; मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरी अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमा उत्सवासाठी (Guru Purnima 2026) जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. बुधवार, २९ जुलै रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.

गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2026) हा श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीभावाचा दिवस मानला जातो. या दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होतात. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी केली आहे.

https://prahaar.in/2026/07/28/rainfall-intensity-to-increase-across-the-state-between-july-29-and-31-citizens-urged-to-remain-alert/

पहाटे २ वाजल्यापासून दर्शनाची सुविधा :

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वटवृक्ष मंदिराचे दरवाजे पहाटे २ वाजताच दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता काकड आरती संपन्न झाली. दिवसभर दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Guru Purnima 2026)

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल :

गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात पूजा-अर्चा, आरती, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजारो भक्त या दिवशी उपस्थित राहतात. त्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. (Guru Purnima 2026)

https://prahaar.in/2026/07/28/nashik-water-supply-shut-off/

वैयक्तिक अभिषेक होणार नाही :

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नियमित वैयक्तिक अभिषेक करण्यात येणार नाहीत. भाविकांना सुरळीत आणि जलद दर्शन मिळावे, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. (Guru Purnima 2026)

भाविकांना प्रशासनाचे आवाहन :

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, शिस्त राखावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरी भक्तिरसात रंगून जाणार असून, “श्री स्वामी समर्थ” यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा संगम असलेला हा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. (Guru Purnima 2026)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here