Home ब्रेकिंग न्यूज Karishma Tanna Baby : गुड न्युज! गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करिश्मा तन्ना झाली आई; गोंडस मुलाला दिला जन्म

Karishma Tanna Baby : गुड न्युज! गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करिश्मा तन्ना झाली आई; गोंडस मुलाला दिला जन्म

0
Karishma Tanna Baby : गुड न्युज! गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करिश्मा तन्ना झाली आई; गोंडस मुलाला दिला जन्म

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि तिचा पती वरुण बंगेरा यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवली आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी, 29 जुलै 2026 रोजी या जोडप्याने आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले. करिश्माने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. (Karishma Tanna)

https://prahaar.in/2026/07/29/action-movie-a-%e2%82%b91600-crore-film-flopped-at-the-box-office-but-became-number-one-worldwide-upon-its-ott-release/

 

पोस्टमध्ये करिश्मा आणि वरुण यांनी नवजात बाळाच्या चिमुकल्या पायांचा फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिले, “गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी जन्म… आमचा सर्वात मोठा आशीर्वाद आला आहे. 29 जुलै 2026, आमच्या जगात तुझे स्वागत आहे, छोट्या राजकुमारा.” (Karishma Tanna Son)

 

करिश्माने यावर्षी 6 एप्रिल रोजी तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर नियमितपणे बेबी बंपचे फोटो, मॅटर्निटी फोटोशूट आणि गरोदरपणातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत होती. तिचे स्टायलिश मॅटर्निटी लुक्सही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. (Entertainment News)

मुलाच्या जन्माची घोषणा होताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अभिनेता सोनू सूद, रकुल प्रीत सिंग, खुशी कपूर, जस्मिन भसीन, वामिका गब्बी, भारती सिंग, अंकिता लोखंडे, अनिता हसनंदानी, रिचा चड्ढा, नेहा धुपिया, निम्रत कौर आणि राज कुंद्रा यांसह अनेक सेलिब्रिटींनी करिश्मा आणि वरुणचे अभिनंदन केले. एकता कपूरने “मम्मीच्या गँगमध्ये स्वागत आहे,” अशी मजेशीर कमेंट करत शुभेच्छा दिल्या. (Celebrity Update)

करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची प्रेमकथा देखील तितकीच खास आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आयोजित केलेल्या नववर्षाच्या पार्टीत दोघांची पहिली भेट झाली होती. त्या भेटीचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आता त्यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. (Viral news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here