मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिने नुकताच आपला वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला आहे. मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील एका साध्या चाळीतून सुरू झालेला तिचा प्रवास आज एका स्वप्नवत टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बालपणी ज्या आलिशान 'ताज लँड एण्ड्स' हॉटेलकडे ती लांबून कौतुकाने पाहायची, त्याच हॉटेलमध्ये तिच्या नवऱ्याने तिचा वाढदिवस(Birthday) साजरा करत तिला एक अविस्मरणीय सरप्राइज दिले आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू मुंबई : "मराठा समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी ...
'कोळीवाड्याच्या रेखा च 'ताज' मधील बर्थडे सेलिब्रेशन :
वरळीच्या कोळीवाड्यात जन्मलेल्या वनिताला तिचे चाहते प्रेमाने 'कोळीवाड्याची रेखा' म्हणूनही हाक मारतात. चाळीतील छोट्याशा घरात राहून तिने अभिनयाची मोठी स्वप्ने पाहिली होती. तिच्या घरासमोरच 'ताज लँड एण्ड्स' हे आलिशान हॉटेल दिमाखात उभे होते. बालपणी रोज त्या हॉटेलकडे पाहताना, 'एक दिवस आपणही तिथे जाऊ' असं एक सुंदर स्वप्न तिच्या मनात तयार झाले होते. आज तेच स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने वनिता अत्यंत भावूक झाली आहे.
ताजच्या खिडकीतून दाखवले बालपणीचे घर :
वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या सेलिब्रेशनचा एक अत्यंत खास व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये ती ताजच्या खिडकीजवळ उभी राहून समोर दिसत असलेल्या वरळी कोळीवाड्याच्या दिशेने हात दाखवताना दिसते.आपला आनंद व्यक्त करताना ती व्हिडिओमध्ये म्हणते:"तिथे समोर माझं घर आहे, ज्या चाळीत मी वाढलेय. आता धुकं आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये, मी लहानपणापासून हे ताज बघतेय. आज मी माझा वाढदिवस याच ताजमध्ये सेलिब्रेट करतेय... बापरे!"
सुमितच्या सरप्राइजने वनिता झाली आनंदित :
वनिताचा पती सुमित याने तिच्या या बालपणीच्या स्वप्नाची आठवण ठेवून अत्यंत गुप्तपणे हे सरप्राइज प्लॅन केले होते. याबद्दल पतीचे आभार मानताना वनिताने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.
ती लिहिते: "सुमित, आयुष्यातला हा सर्वात अविस्मरणीय वाढदिवसाचं सरप्राइज दिल्याबद्दल आणि इतकं सुंदर सेलिब्रेशन(Celebration) प्लॅन केल्याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रत्येक क्षण प्रेम, आनंद आणि हास्याने भरलेला होता. किती सरप्राइज मिळालं याची मोजदादच राहिली नाही, प्रत्येक क्षण तू जादुई करून टाकलॉस. काही वाढदिवस फक्त साजरे होतात, पण काही कायमच्या आठवणी बनून मनात जपले जातात; हा वाढदिवस त्यापैकीच एक आहे. मला इतकं खास आणि नशीबवान असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद."
मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना लहान वयातच लठ्ठपणा तसेच विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी अन्न व औषध ...
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव :
वनिताचा हा व्हिडिओ आणि तिची ही भावूक(Emotional) पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका साध्या कुटुंबातून येऊन स्वकर्तृत्वावर इथपर्यंत पोहोचलेल्या वनिताच्या या प्रवासाचे तिचे चाहते, मराठी कलाविश्वातील कलाकार आणि नेटकरी मनापासून कौतुक करत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.






