Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिक जिल्ह्यांत ६ तासांत भूकंपाचे ४ धक्के

Nashik : नाशिक जिल्ह्यांत ६ तासांत भूकंपाचे ४ धक्के

0
Nashik : नाशिक जिल्ह्यांत ६ तासांत भूकंपाचे ४ धक्के

Nashik : नाशिक जिल्ह्यात भूकंपांच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरात 24 तासात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अवघ्या आठ तासांत तब्बल चार भूकंपाचे धक्के जाणवल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. २५ ते २८ जुलै या कालावधीत सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील सहा प्रमुख गावांत भूकंपाची नोंद झाली. कोणतीही मोठी हानी नसली तरी एकाच दिवशी वारंवर झालेल्या या भूकंपाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://prahaar.in/2026/07/29/she-had-been-missing-for-24-hours-her-body-was-found-in-kala-talav-32-cctv-cameras-were-non-functional-what-exactly-happened-in-kalyan/

भूकंपांच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

नाशिक जिल्ह्यात भूकंपांच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. धरणं , पूल, शासकीय इमारती , शाळा , वस्तीगृह तपासून आवश्यक तातडीच्या उपायोजना करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) या तालुक्यात विशेषता क्षत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूकंपाचे धक्के बसलेल्या परिसरात पाहणी केल्यानंतर अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/07/29/pratap-sarnaik-deadline-for-ncmc-smart-card-now-extended-till-september-1/

जिल्ह्यांत ६ तासांत भूकंपाचे ४ धक्के

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (२८ जुलै) अवघ्या सहा तासांत तब्बल चार भूकंपाचे धक्के जाणवल्याने चिंतेचे वातावरण पसरले. २५ ते २८ जुलै या कालावधीत सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील सहा प्रमुख गावांत भूकंपाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांत सर्वाधिक धक्के सुरगाणा तालुक्यात जाणवले. २५ जुलै रोजी बोरगाव येथे सलग चार वेळा धक्के बसले. दिंडोरी परिसरात दोनदा हादरे बसले. २६ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील मानेस आणि भोरमाळ परिसर हादरला. २७ जुलैला पेठ तालुक्यातील कोठुळा आणि आंबे येथे धक्के जाणवले. त्यानंतर मंगळवारी (दि. २८) पुन्हा आंबे आणि कोठुळा परिसरात अनेक वेळा भूकंप जाणवला.

https://prahaar.in/2026/07/29/orders-prohibiting-weapons-and-assembly-issued-in-nashik/

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक भागातील लोकांना तातडीने स्थलांतरासाठी सुरक्षित ठिकाणे प्रशासनाने निश्चित केली असून जिल्ह्यातील भूकंपाचा इतिहास पाहता ऑगस्टमध्येही धक्क्यांची शक्यता आहे. तसेच तडे गेलेल्या इमारतीत राहू नका; मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूक रहा असं आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here