Home क्राईम BEED CRIME : परळीत घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच आरोपीचा अंत

BEED CRIME : परळीत घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच आरोपीचा अंत

0
BEED CRIME :  परळीत घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच आरोपीचा अंत
crime

बीड: परळी तालुक्यातून एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक आणि दुःखद घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परळी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

https://prahaar.in/2026/07/29/she-had-been-missing-for-24-hours-her-body-was-found-in-kala-talav-32-cctv-cameras-were-non-functional-what-exactly-happened-in-kalyan/

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास परळी तालुक्यातील एका गावात ही गंभीर घटना घडली. संबंधित तरुण शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसला. तिथे तिच्याशी बोलण्याच्या कारणावरून त्याने वाद घातला आणि सुरुवातीला तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धारदार विळ्याने वार करून मुलीला गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

https://prahaar.in/2026/07/29/pratap-sarnaik-deadline-for-ncmc-smart-card-now-extended-till-september-1/

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘बीएनएस’ (भारतीय न्यायसंहिता) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला.

https://prahaar.in/2026/07/29/shocking-incident-in-nagpur-bloody-attack-over-old-dispute-three-attacked-with-sword-and-knife-after-entering-house/

आरोपीचा शोध आणि दुःखद अंत

गुन्हा दाखल झाल्यापासूनच आरोपी तरुण फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात असून, त्याच्या अटकेसाठी विशेष पथकाचीही मदत घेतली जात होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ‘पिंक पथकाकडे’ सोपविण्यात आला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच मंगळवारी सकाळी एक धक्कादायक माहिती समोर आली. परळी शहरातील अंबाजोगाई रोडवरील शासकीय महाविद्यालयाच्या पाठीमागील डोंगर परिसरात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत या युवकाचा मृतदेह आढळून आला.

https://prahaar.in/2026/07/29/promoting-development-based-on-transferable-development-rights-tdr/

माहिती मिळताच परळी शहर आणि परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेwवायकांच्या ताब्यात देण्यात आला.

संबंधित युवकाने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीच आरोपीने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. मुलीवर झालेल्या हल्ल्याचे नेमके कारण काय होते आणि या प्रकरणामागील इतर नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबतचा सखोल तपास परळी शहर पोलिसांकडून पुढे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here