Home ब्रेकिंग न्यूज NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही!

NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही!

0
NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही!

– शरद पवार; विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने झडत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही,” असे स्पष्टीकरण देत मंगळवारी शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. (NCP)

https://prahaar.in/2026/07/28/complete-the-work-on-thane-district-general-hospital-on-a-fast-track-basis-deputy-chief-minister-eknath-shindes-directives/

गेल्या काही दिवसांत दिल्लीतील राजकीय घडामोडींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ‘नीट’ आंदोलनाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. तसेच सुप्रिया सुळे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. १० ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या कौटुंबिक विवाह सोहळ्याच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर या भेटी झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी या सर्व घडामोडींमुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शरद पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. (Sharad Pawar)

 

‘आमचे बहुतांश लोक लढायला तयार’ : रोहित पवार

दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळून लावल्या. “शरद पवार हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींना भेटले होते. ते कोणत्याही परिस्थितीत एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्या पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार संघर्षासाठी तयार आहेत. आम्ही विचार आणि जनतेशी बांधील असून एनडीएसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.