Home ब्रेकिंग न्यूज Trump Warns Israel : “आम्ही कोणाशी डील करावी हे कोणी शिकवू नये,” ट्रम्प यांचा इस्रायलला दम

Trump Warns Israel : “आम्ही कोणाशी डील करावी हे कोणी शिकवू नये,” ट्रम्प यांचा इस्रायलला दम

0
Trump Warns Israel : “आम्ही कोणाशी डील करावी हे कोणी शिकवू नये,” ट्रम्प यांचा इस्रायलला दम
donald trump israel conflict

अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा विरोध थेट फेटाळून लावला आहे. अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांना कोणती शस्त्रे किंवा वस्तू विकेल, हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी इस्रायलला सुनावले आहे. तुर्कीला ‘एफ-३५’ लढाऊ विमानांच्या विक्रीवरून हा वाद निर्माण झाला आहे.

https://prahaar.in/2026/07/28/pimpri-chinchwad-metro-momentum-for-nigdi-chakan-metro-corridor-%e2%82%b912937-crore-plan-submitted/

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू वॉशिंग्टनच्या दौऱ्यावर दाखल झाले असतानाच ट्रम्प यांनी ही आक्रमक टिप्पणी केली आहे. इराणसोबत अमेरिका आणि इस्रायलचे युद्ध सुरू झाल्यापासून नेतान्याहू आणि ट्रम्प यांची ही पहिलीच समोरासमोरची भेट आहे. अशा महत्त्वाच्या बैठकीच्या तोंडावर ट्रम्प यांचे हे वक्तव्य इस्रायलसाठी एक मोठा धक्का मानले जात आहे.

https://prahaar.in/2026/07/28/sharad-pawar-parth-pawar-and-praful-patel-met-sharad-pawar/

एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी तुर्कीचा जोरदार बचाव केला. तुर्की हा अमेरिकेचा एक अत्यंत चांगला भागीदार आणि मित्र देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सीरियासह विविध प्रादेशिक घडामोडींमध्ये तुर्कीने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

https://prahaar.in/2026/07/28/indian-railways-tatkal-ticket-booking-rules-to-change-from-august-1-new-token-system-to-be-implemented-at-railway-stations/

सत्तेचे संतुलन बिघडण्याची इस्रायलची भीती

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तुर्कीला ‘एफ-३५’ (F-35) लढाऊ विमाने देण्याच्या शक्यतेला तीव्र विरोध दर्शवला होता. तुर्कीला ही विमाने मिळाल्यास मध्य-पूर्वेतील लष्करी सत्तेचे संतुलन बिघडू शकते, असा दावा नेतन्याहू यांनी केला होता. सध्या मध्य-पूर्वेत इस्रायल हा एकमेव देश आहे, ज्याच्याकडे ही अत्याधुनिक लढाऊ विमाने उपलब्ध आहेत.

https://prahaar.in/2026/07/28/from-dream-girl-to-a-popular-political-journey-why-did-dharmendra-oppose-hema-malinis-entry-into-politics/

दरम्यान, तुर्की हा इस्रायल किंवा नेतन्याहू यांचा समर्थक नाही, हे ट्रम्प यांनी मान्य केले. परंतु, यामुळे अमेरिका आपल्या धोरणात्मक निर्णयांमध्ये तडजोड करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि तुर्कीचे संबंध अत्यंत दृढ असल्याचे सांगत ट्रम्प यांनी इस्रायलच्या दबावासमोर झुकण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या उच्चस्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावर काय चर्चा होते आणि याचे आगामी काळात राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here