Home ब्रेकिंग न्यूज BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

0
BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये ताकाच्या ग्लासात माशी आढळल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅन्टीनवर धाड टाकून सखोल तपासणी केली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुमारे पाच तास संपूर्ण कॅन्टीनची पाहणी तसेच तपासणी केल्यानंतर येथील सेवा तात्काळ बंद करण्याचे निर्देश देत हे उपहार गृह बंद करण्याचे निर्देश दिले. (Mumbai) घटनेनंतर याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले आणि यामुळे महापालिकेची बदनामी झाल्यामुळे तसेच याची पुरक माहितीही अधिकाऱ्यांकडे नसल्याने याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. प्रशासनाने आपल्या स्तरावर अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून यावर कारवाई करावी असे निर्देश दिले. (BMC)

https://prahaar.in/2026/07/24/the-force-of-virtuous-rain-continues-shahrala-orange-ghatmathyala-red-alert/

महापालिका मुख्यालयातील उपहारगृहातील खाद्यपदाथ विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने तसेच योग्यप्रकारची काळजी न घेतल्याचे प्रत्यक्ष तपासणीमध्ये आढळून आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने महापालिका उपहारगृहाचे चालक कमल कॅटरर्स यांना रात्री उशिरा नोटीस बजावून उपहार गृह बंद (Food Safety) करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महापालिकेतील सर्वात मोठे उपहार गृह बंद ठेवण्याची नामुष्की आली. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिकेतील उपहार गृह बंद ठेवण्याची वेळ आल्याचे सांगत त्यांनी एवढा अनोगोंदी कारभार सुरु असताना सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे माहित नसावे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे सांगितले. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांचीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समितीमध्ये येवून निवेदन करावे असे निर्देश दिले. त्यानुसार कामगार अधिकारी यांनी सुनील जांगळे यांनी रात्री उशिरा याबाबतची नोटीस संबंंधित कॅटरर्स कंपनीच्या मेलवर प्राप्त झाली आहे. त्याठिकाणी अनियमितता दिसून आल्याने ते बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र याबाबतची संपूर्ण माहिती ते देवू न शकल्याने स्थायी समिती अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (FDA Inspection)

https://prahaar.in/2026/07/24/next-48-hours-are-extremely-dangerous-rain-with-speed-of-70-km-h-and-heavy-rain-or-5-districts-red-alert/

यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ही बाब गंभीर असून याबाबत कामगार अधिकाऱ्यांकडे सकाळपासून विचारणा केली तसेच याबाबत स्थायी समितीत आपल्याला निवेदन करावे लागेल अशीही कल्पना दिली होती. तरीही त्यामुळे सर्वांत मोठा निष्काळजीपणा असून या कँन्टीन बंदमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली असून येथील कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था का केली नाही. तसेच शेड्युल्ड रेटप्रमाणे कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होवूनही त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल करत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या प्रशासनाने कारवाई करावी असे निर्देश दिले. (Food Department)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here