Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

0
Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस
Mumbai Dams

– पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार आज (२३ जुलै) नाशिक घाट, पालघर, पुणे घाट आणि घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट, तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि सातारा घाटासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिवृष्टी, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Monsoon Update)

https://prahaar.in/2026/07/23/heart-wrenching-incident-in-nagpur-8-year-old-student-dies-after-suddenly-collapsing-while-running-during-the-school-recess/

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक नसल्यास घाटमाथा आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, राज्यातील पावसाची आकडेवारीही समाधानकारक आहे. २३ जुलैपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ४२९ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या ९४.६८ टक्के इतकी आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘लार्ज एक्सेस’ म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. (Maharashtra Monsoon Update)

https://prahaar.in/2026/07/23/minister-nitesh-rane-questions-the-purpose-behind-sar-tan-se-juda-slogans-during-the-neet-protests/

यामध्ये रायगडमध्ये १,८६०.४ मिमी, पालघरमध्ये १,६९९.७ मिमी, रत्नागिरीत १,६५७.४ मिमी आणि ठाण्यात १,५३५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक १८३ मिमी पाऊस पालघर जिल्ह्यात, तर ९५ मिमी पाऊस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तास नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच घाट परिसरात दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Monsoon Update)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here