Home ब्रेकिंग न्यूज Ameet Satam : ‘सीजीपी’चे आंदोलन हे देशाबाहेरील शक्तींचे षडयंत्र!

Ameet Satam : ‘सीजीपी’चे आंदोलन हे देशाबाहेरील शक्तींचे षडयंत्र!

0
Ameet Satam : ‘सीजीपी’चे आंदोलन हे देशाबाहेरील शक्तींचे षडयंत्र!

– अमित साटम; डाव्या संघटना आणि राष्ट्रविरोधी शक्तींचा आंदोलनात हात

मुंबई : “भारत लवकरच ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनून जगातील तिसरी मोठी आर्थिक सत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारताचा हा विकास देशाबाहेरील शक्तींना खुपत असून, तो रोखण्यासाठीच भाजपला सत्तेवरून हटवण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे,” असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी गुरुवारी केला. या षडयंत्रासाठी विरोधी पक्षांनी ‘टुकडे तुकडे गँग’शी हातमिळवणी केली असून, डाव्या संघटना आणि देशविरोधी शक्तींनी हे आंदोलन ताब्यात घेतल्याने त्याला हिंसक वळण लागल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या मुंबई कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी ‘सीजीपी’च्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला. “या आंदोलनासाठी विशेष ‘टूलकिट’ तयार करण्यात आले आहे. एआयएसएफ, एआयएसए, एसएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनांसह आम आदमी पक्षाची ‘एएसएपी’ आणि देशविरोधी संघटना या आंदोलनाला पुढे ढकलत आहेत. तसेच कॉलीन गोन्सालवीस, नंदिता नरेन, अरुंधती रॉय, राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव हे या आंदोलनाचे मार्गदर्शक आहेत,” असा आरोप साटम (Ameet Satam) यांनी केला.

https://prahaar.in/2026/07/23/maharashtra-monsoon-update-heavy-rainfall-continues-in-maharashtra-the-state-has-received-over-95-of-its-average-rainfall-so-far/

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी (NEET Exam) सरकारने सर्व आवश्यक पावले उचलल्याचा दावा करत साटम म्हणाले, “पेपरफुटीची माहिती मिळताच परीक्षा रद्द करून शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे गुन्हा नोंदवला आणि एसआयटी गठीत केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी पुढील वर्षापासून संगणकावर आधारित (सीबीटी) परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. २१ जून रोजी नव्याने परीक्षा घेऊन निकालही घोषित करण्यात आला आहे. सर्व उपाययोजना केलेल्या असतानाही केवळ राजकीय स्वार्थासाठी आंदोलन ताणले जात आहे.”

विरोधकांवर निशाणा साधताना ते (Ameet Satam) म्हणाले की, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आपली भूमिका मांडण्यात अपयशी ठरल्यामुळेच त्यांना या आंदोलनाचा आधार घ्यावा लागत आहे. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही आंदोलक अटी बदलत असून, त्यांना चर्चा नको तर केवळ भाजपला सत्तेतून खेचायचे आहे. मात्र, देशविरोधी शक्तींचा हा कावा कधीही यशस्वी होणार नाही.

https://prahaar.in/2026/07/23/minister-nitesh-rane-questions-the-purpose-behind-sar-tan-se-juda-slogans-during-the-neet-protests/

आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरेल :

देशातील जनता सर्व काही जाणून आहे, त्यामुळे हे देशविरोधी आंदोलन अपयशी ठरेल. महाराष्ट्र बंदचा उडालेला फज्जा हेच दर्शवतो की या आंदोलनाला सर्वसामान्यांचा कोणताही पाठिंबा नाही. त्यामुळे देशातील तरुणांनी अशा भारतविरोधी शक्तींच्या खोट्या प्रचाराला अजिबात बळी पडू नये, असे आवाहन आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here