धुळे : धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला बुधवारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमधून धुराचे लोट निघताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. (Shivshahi Bus Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारहून धुळ्याकडे येणारी शिवशाही बस नगाव बारी परिसरात पोहोचली असताना अचानक बसच्या इंजिनाच्या भागातून धूर येऊ लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला वेढा घातला. आग पाहताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. (Shivshahi Bus Fire)
https://prahaar.in/2026/07/22/uncle-killed-over-land-dispute-accident-staged-to-cover-it-up/
मात्र, चालकाने धीर न सोडता तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, तोपर्यंत आगीने बसचा मोठा भाग जळून खाक झाला होता. (Shivshahi Bus Fire)
https://prahaar.in/2026/07/22/investigate-the-distribution-of-money-in-the-nashik-legislative-council-election/
प्राथमिक माहितीनुसार, बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला असून, चालकाच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. (Shivshahi Bus Fire)
View this post on Instagram