Home क्रीडा Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

0
Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी सदस्य डेव्हिड वॉर्नर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. यात डेव्हिड वॉर्नरने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियात या प्रकरणाची सतत चर्चा सुरू आहे. (Australian Cricket Star)

https://prahaar.in/2026/07/22/famous-actress-dies-in-car-accident/

वर्षाच्या सुरुवातील त्याने ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याची ब्रेथ ॲनॅलायझर टेस्ट केली. या चाचणीत वॉर्नरने कायदेशीर मर्यादापेक्षा अधिक ड्रिंक केल्याचे समोर आले. त्यावेळी वॉर्नर स्वत: कार चालवत होता, म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर तो जामिनावर सुटला होता. पण हे प्रकरण न्यायलयात प्रलंबित होते.या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणी दरम्यान वॉर्नर न्यायालयात गैरहजर होता. वॉर्नरच्यावतीने न्यायालयात त्याचे वकील हजर होते. न्यायालयात त्यांनी वॉर्नरच्यावतीने गुन्ह्याची कबुली देणारे पत्र सादर केले. नंतर वकिलाने न्यायालयासमोर वॉर्नरच्या कामगिरीचा उल्लेख केला तसेच त्याची प्रतिमा जपण्यासाठी युक्तिवाद केला. अनेकजण चुका करतात. चुकीचे निर्णय घेतात. पण केलेली चूक स्वीकारणे आणि ती सुधारण्यासाठी तयार होणे महत्त्वाचे आहे जे वॉर्नर करत असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला.

https://prahaar.in/2026/07/22/ankita-walawalkar-i-am-not-supporting-cjp-instead-i-am-bigg-boss-fame-ankita-walawalkar-takes-a-clear-stand/

तुम्ही उद्योगपती असाल, डॉक्टर असाल किंवा जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक असाल,. पण दारूच्या नशेत वाहन चालवणे हे धोकादायक आहे, असे सांगत वॉर्नरच्या वकिलाने त्याची बाजू सावरण्यासाठी युक्तिवाद केला.न्यायालयात आता वॉर्नरच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. लवकरच या प्रकरणात निर्णय येण्याची शक्यता आहे.कायदेशीर संकटाला सामोरा जात असलेला वॉर्नर क्रिकेटमधील परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वॉर्नर जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये खेळताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here