Wednesday, July 22, 2026

Nashik : खासगी वसतिगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या, शहरात खळबळ

Nashik : खासगी वसतिगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या, शहरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक शहरात खळबळजनक घटना घडली आहे. खासगी वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

अंजली कैलास बागुल असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. अंजली संदीप फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,अंजलीने वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील तिच्या खोलीत स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंजलीने टोकाचं पाऊल का उचललं ?

अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अंजलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे अंजलीच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >