Home ब्रेकिंग न्यूज Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीने केला ‘केमो कर्ल्स’मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीने केला ‘केमो कर्ल्स’मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

0
Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीने केला ‘केमो कर्ल्स’मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी झुंज देत असल्याचा खुलासा केल्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री शुभा गोडबोले (Shubha Godbole Cancer) यांनीही आपण कॅन्सरवर उपचार घेत असल्याची माहिती सोशल मीडियावरील भावनिक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहते आणि कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शुभा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले असून त्यामध्ये त्यांचे नव्याने आलेले कुरळे केस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंसोबत त्यांनी ‘केमो कर्ल्स’ (Chemo Curls) बद्दलचा अनुभव मांडत कॅन्सरच्या प्रवासाविषयी मन मोकळे केले. (Shubha Godbole Cancer)

https://prahaar.in/2026/07/21/a-historic-feat-at-the-tender-age-of-just-3-years-and-4-months-young-fort-enthusiast-rajvardhini-chavan-has-scaled-a-staggering-100-forts/

‘केमो कर्ल्स’ म्हणजे काय?

पोस्टमध्ये शुभा गोडबोले लिहितात, “माझे हे नवीन कुरळे केस माझ्या आधीच्या केसांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. ‘केमो कर्ल्स’ नावाची गोष्टही असते, हे मला गुगल केल्यावर समजलं. केमोथेरपीदरम्यान केस पूर्णपणे गळून गेल्यानंतर जे नवीन केस येतात, ते अनेकactor दा कुरळे असतात. काहींचे केस नंतर पुन्हा पूर्वीसारखे होतात, तर काहींचे कायम असेच राहतात. माझे हे ‘केमो कर्ल्स’ बहुधा कायमचेच राहणार आहेत. आता मला माझे जुने केस जास्त आवडायचे की हे नवे, हेच ठरवता येत नाही.” त्यांच्या या प्रामाणिक आणि सकारात्मक शब्दांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. (Shubha Godbole Cancer)

गेल्या वर्षी झाले कॅन्सरचे निदान :

मिळालेल्या माहितीनुसार, शुभा गोडबोले यांना गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असून त्या मोठ्या धैर्याने आणि सकारात्मकतेने या आजाराचा सामना करत आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवत जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला आहे. (Shubha Godbole Cancer)

https://prahaar.in/2026/07/21/sharaddha-kapoor-eetha-movie-vithabai-narayangaonkar-biopic-new-controversy-family-allegations/

चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव :

शुभा गोडबोले यांच्या पोस्टनंतर चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या धैर्याचे आणि सकारात्मक विचारांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना शुभा गोडबोले यांनी दाखवलेली जिद्द आणि आत्मविश्वास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या भावनिक पोस्टने हजारो चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला आहे. (Shubha Godbole Cancer)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here