मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयाने (MCOCA Court) अनमोल बिश्नोईविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारी पक्षाने दाखल केलेल्या अर्जानंतर हा आदेश देण्यात आला. अनमोल बिश्नोईला अटक करून पुढील चौकशीसाठी न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. (Baba Siddique)
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. ( Baba Siddique Murder Case)
https://prahaar.in/2026/07/21/major-operation-by-mumbai-crime-branch-37-bangladeshi-nationals-detained-on-suspicion-of-illegal-stay/
विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला होता. यापूर्वी अमेरिकेतून भारतात हद्दपार झाल्यानंतरही अनमोल बिश्नोईला ताब्यात घेण्यात आले नसल्याबद्दल विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. (Mumbai Crime)
विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी सरकारी पक्षाचा अर्ज मंजूर करत, अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi,) सध्या ज्या न्यायालयाच्या ताब्यात आहे तेथून त्याला हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. (NCP)
https://prahaar.in/2026/07/20/bmc-urges-mumbaikars-to-drink-filtered-and-boiled-water/
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी मोहम्मद यासीन अख्तर उर्फ सिकंदर उर्फ जस्सी आणि शुभम लोणकर उर्फ शुब्बू यांच्याविरुद्धही न्यायालयाने घोषणापत्र जारी केले आहे. या दोघांविरुद्ध यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याची नोंद न्यायालयाने केली.
या प्रकरणात बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनमोल बिश्नोईची कोठडी मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आवश्यक पावले उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाने तपास यंत्रणेला तिच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांची आठवण करून देत गंभीर गुन्ह्यांच्या तपासात विलंब होऊ नये, असे स्पष्ट केले. (Mumbai News)