Home ब्रेकिंग न्यूज Pune MHADA : पुण्यात घर घेण्याची मोठी संधी! म्हाडाकडून ताथवडेत 634 सदनिका विक्रीसाठी; 46 लाखांपासून घरांची सुरुवात

Pune MHADA : पुण्यात घर घेण्याची मोठी संधी! म्हाडाकडून ताथवडेत 634 सदनिका विक्रीसाठी; 46 लाखांपासून घरांची सुरुवात

0
Pune MHADA : पुण्यात घर घेण्याची मोठी संधी! म्हाडाकडून ताथवडेत 634 सदनिका विक्रीसाठी; 46 लाखांपासून घरांची सुरुवात

पुणे : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी म्हाडाने मोठी गृहयोजना जाहीर केली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) ताथवडे फेज-2 येथे 634 सदनिकांच्या विक्रीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या या प्रकल्पात परवडणाऱ्या दरात 1 BHK आणि 2 BHK घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (MHADA)

https://prahaar.in/2026/07/21/government-clarifies-stance-on-e20-petrol-in-parliament-claims-no-concrete-evidence-of-engine-damage/

यंदाच्या योजनेत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे उत्पन्नाची अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उत्पन्न गटातील नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करताना 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 किंवा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षांपैकी एका वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल. यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) किंवा तहसीलदारांचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. (Pune MHADA)

सदनिकांची प्रत्यक्ष पाहणी करता यावी यासाठी प्रकल्पात नमुना फ्लॅटही तयार करण्यात आला आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 1 BHK आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 2 BHK सदनिका उपलब्ध असतील. (Pune News)

या प्रकल्पात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. क्लब हाऊस, चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, स्विमिंग पूल, ओपन जिम, योगा आणि मेडिटेशन रूम, मल्टिपर्पज हॉल, मुलांसाठी खेळण्याची जागा, ईव्ही चार्जिंग स्टेशन, इंडोअर गेम्स तसेच सोलर ऑन-ग्रिड प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. (MAHDA News)

https://prahaar.in/2026/07/20/ramayana-part-1-trailer-leaked-before-official-release-makers-launch-anti-piracy-action/

या योजनेत 1 BHK सदनिकांची किंमत सुमारे 46 लाख रुपयांपासून सुरू होते, तर 2 BHK सदनिकांची किंमत 64.5 लाख रुपयांपर्यंत आहे. (Mhada Lottery )

अर्जासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचा रद्द केलेला धनादेश किंवा पासबुकचे पहिले पान, व्हॉट्सअॅप क्रमांकासह मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच 2018 नंतरचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) सादर करणे आवश्यक आहे. (Affordable Housing)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here