Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

0
Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता

मुंबई : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती, पदोन्नती आणि प्रशासकीय चौकटीत तब्बल पाच दशकांनंतर बदल घडवून आणण्यात आला आहे. महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध आणि सेवाप्रवेश नियम (रिक्रूटमेंट रूल्स – आर. आर.) लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सन १९७७ नंतर पहिल्यांदाच झालेल्या या व्यापक बदलांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता कायमचे मार्गी लागणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. (Chandrashekar Bawankule)

https://prahaar.in/2026/07/21/a-historic-feat-at-the-tender-age-of-just-3-years-and-4-months-young-fort-enthusiast-rajvardhini-chavan-has-scaled-a-staggering-100-forts/

मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागाच्या नवीन आकृतीबंधाला आणि सेवाप्रवेश नियमावलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली आहे. १९७७ नंतर म्हणजेच तब्बल ५० वर्षांनंतर महसूल रचनेत हा बदल घडवण्यात आला आहे. या निर्णयामुळे विभागातील सेवाज्येष्ठता, पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होऊन प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा व पारदर्शकता येईल.

https://prahaar.in/2026/07/21/amravati-crime-dispute-over-a-pigeon-two-close-friends-murdered-eight-arrested/

दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) अधिकारी आणि चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) गैरव्यवहाराच्या आरोपांवर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी सांगितले की, एसआरएमध्ये वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आल्यास त्यांची सखोल चौकशी केली जाईल. यातील नगरविकास विभागाशी संबंधित तक्रारींची चौकशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, तर महसूल विभागाशी संबंधित चौकशी स्वतः महसूल विभाग करेल आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.(Chandrashekar Bawankule)

https://prahaar.in/2026/07/21/kangana-ranaut-says-mps-were-scared-amid-cjp-protest-thanks-delhi-police-for-being-a-shiel/

राजकीय पोळी भाजण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन

विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका हा लोकशाहीचा भाग असला तरी देशातील १४० कोटी जनतेने मोदींना सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच ‘नीट’ परीक्षा गोंधळाचा उल्लेख करत बावनकुळे यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनावर टीका केली. पेपरफुटीच्या घटनेनंतर सरकारने तातडीने त्रुटी दूर करून स्वतःहून कठोर पावले उचलली आहेत. असे असतानाही तरुणांना भडकवण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी दगडफेकीसाठी दगड गोळा केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या या षड्यंत्राची व असामाजिक तत्त्वांची सखोल चौकशी सुरू असल्याचेही महसूलमंत्र्यांनी नमूद केले.(CJP Protest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here