Home क्राईम Amravati Crime : कबुतरावरून वाद ! दोन जिवलग मित्रांची हत्या; आठ जणांना अटक

Amravati Crime : कबुतरावरून वाद ! दोन जिवलग मित्रांची हत्या; आठ जणांना अटक

0
Amravati Crime : कबुतरावरून वाद ! दोन जिवलग मित्रांची हत्या; आठ जणांना अटक

अमरावती : अमरावतीच्या वलगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबूतर चोरीच्या आरोपावरून दोन जीवलग मित्रांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. वलगाव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीसांनी वलगावच्या सरपंचासह सात जणांना अटक केली आहे. (Amravati Crime)

https://prahaar.in/2026/07/21/mumbai-police-major-action-by-mumbai-police-following-cjps-protest-cases-registered-against-over-900-protesters-across-8-police-stations/

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, कबूतर चोरल्याच्या वादातून ऋतिक पंडित आणि संजोग जोशी या दोन तरुणांची पाच हल्लेखोरांनी वलगाव बसस्थानक परिसरात धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्याकांडात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

https://prahaar.in/2026/07/21/provide-facilities-for-the-1008-khalsas-widen-the-shahi-snan-route/

मध्यरात्रीच्या सुमारास संजोग आणि ऋतिक हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात गेले होते. त्यावेळी त्याच्यांवर पाच जणांनी जीवघेणे हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की, या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांची हत्या करणारे पाचही आरोपी हे २५ वर्षे वयोगटातील आहेत. या प्रकरणात सरपंचाचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलिस करत आहेत. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Murder Case)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here