भारतातील खासगी अंतराळ क्षेत्राने ऐतिहासिक झेप घेत स्कायरूट एरोस्पेसच्या ‘विक्रम-१’ या देशातील पहिल्या खासगी कक्षीय रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारताने अमेरिका आणि चीननंतर खासगी कक्षीय रॉकेट प्रक्षेपित करणाऱ्या देशांच्या अग्रगण्य यादीत स्थान मिळवत अंतराळ अर्थव्यवस्थेच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.
शनिवारचा दिवस भारतासाठी शुभ होता. कारण शनिवारी भारतातर्फे स्कायरूट एरोस्पेस या हैदराबादस्थित खासगी कंपनीने विकसित केलेले ‘विक्रम-१’ हे देशातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरीत्या अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. त्याला नाव दिले आहे ते भारताचे विख्यात शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे. स्कायरूट हैदराबाद येथील स्टार्टअप आहे आणि ३०० किलोग्रामचा पेलोड घेऊन या रॉकेटने अवकाशात उड्डाण केले आणि कक्षेत ते स्थिर झाले. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमासाठी हा मैलाचा दगड आहे आणि दोन दिवसांपूर्वी इस्रो या अंतराळ संस्थेतून १०० लोकांनी राजीनामे दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर ही बातमी निश्चितच आनंददायी आणि उत्साहवर्धक आहे. सतीश धवन स्पेस सेंटरवरून अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेले हे रॉकेट पहिल्याच प्रयत्नात आपल्या कक्षेत स्थिर झाले. भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हा मैलाचा दगड तर आहेच पण यासाठी ही बातमी महत्वाची आहे कारण अमेरिका आणि चीननंतर आता भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे, ज्याने हा पराक्रम करून दाखवला. विशेष म्हणजे ते संपूर्ण एतद्देशीय बनावटीचे आहे.(Vikram-1)
https://prahaar.in/2026/07/20/sanjay-raut-is-trying-to-incite-the-youth-of-the-country-his-efforts-will-not-succeed-navnath-ban/
महत्वाची बाब म्हणजे या लॉंचमुळे जागतिक कंपन्यांसाठी व्यावसायिक बाजारपेठ खुली झाली आहे. या रॉकेटने भारतासाठी इतिहास रचला आहे. कारण हे पहिले खासगी रॉकेट आहे जे व्यावसायिक कामासाठी वापरले जाईल. स्कायरूट या स्टार्टअपने हे विकसित केले असून त्याची किंमत १.१ अब्ज डॉलर आहे. भारतही आता त्या अगदी थोडक्या देशांत जाऊन बसला आहे ज्यांनी स्वतःचे खासगी रॉकेट अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत. याचा अर्थ भारतही आता अंतराळ प्रक्षेपण क्षेत्रात मोठा खेळाडू ठरला आहे. आणखी एक भारतासाठी गौरवास्पद बाब म्हणजे भारतातील खासगी रॉकेट लॉंच क्षेत्राने इतिहास घडवला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला अंतराळ कार्यक्रमाच्या शिरोभागी नेऊन ठेवले आहे. त्याशिवाय चांद्रयान, गगनयान आणि अशा कितीतरी मोहीमा आहेत ज्या लवकरच येत आहेत. त्याबाबत मोदींचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भारताने विज्ञानाची ही झेप घेतली आहे ती अन्य क्षेत्रात प्रगती करत ही बाब येथे महत्वाची आहे. नुकतीच भारताची पहिलीवहिली हायड्रोजन ट्रेन सुरू झाली आणि विक्रम १ चे उड्डाण अवकाशात प्रक्षेपित झाले. आता खासगी क्षेत्रही अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक अंतराळ अर्थव्यवस्थेला गती देत ‘विक्रम-१’ भारताच्या स्पेस क्षेत्रासाठी नवे पर्व ठरणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करून भारताचा जागतिक लघु उपग्रह प्रक्षेपण बाजारातील वाटा वाढविण्यास या रॉकेटची मोठी मदत होणार आहे. संपूर्ण कार्बन रचना वापरल्यामुळे रॉकेटचे वजन कमी झाले आहे, तर ३-डी प्रिंटेड इंजिन्समुळे उत्पादनासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या प्रक्षेपण यानाला ‘कॅब टू स्पेस’ अशी संकल्पना देण्यात आली आहे.(First Private Orbital Rocket)
https://prahaar.in/2026/07/20/mumbai-mhada-lottery-2026-the-wait-for-the-mhada-lottery-is-finally-coming-to-an-end-major-update-regarding-the-draw-for-2640-homes-in-mumbai/
जशी कॅब सेवा प्रवास सोपा, जलद आणि सुलभ करते, त्याचप्रमाणे उपग्रहांना अंतराळात पोहोचविण्याची ही एक विश्वासार्ह आणि वेळ वाचवणारी सेवा ठरणार आहे. ‘विक्रम-१’च्या पहिल्या उड्डाणाला ‘आगमन’ हे नाव देण्यात आले आहे. संस्कृतमध्ये ‘आगमन’ म्हणजे ‘येणे’ किंवा ‘नव्या पर्वाची सुरुवात’ आहे. ‘विक्रम-१’च्या यशस्वी उड्डाणामागे अनेक तांत्रिक आव्हाने होती. प्रगत कार्बन कॉम्पोझिट रचना आणि ३-डी प्रिंटेड इंजिनच्या निर्मितीत उच्च दर्जाचे गुणवत्ता नियंत्रण राखावे लागले. या सर्व अडथळ्यांवर मात करत स्कायरूट एरोस्पेसने भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला. सुमारे सात मजली इमारतीएवढे उंच असलेले हे रॉकेट पृथ्वीपासून सुमारे ३५० किलोमीटर उंचीवरील कक्षेत सुमारे ३५० किलो पेलोड नेले तर २०३३ पर्यंत ४४ अब्ज अंतराळ अर्थव्यवस्था जाण्याची भारताला आशा आहे. आता भारताची स्पर्धा इलन मस्क यांच्या स्पेस एक्स या अंतराळ कार्यक्रमाशी आहे आणि आता या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. आतापर्यंत रॉकेट निर्मितीचे काम प्रामुख्याने इस्रोकडे होते; मात्र प्रथमच एका खासगी कंपनीने कक्षीय रॉकेट विकसित करून यशस्वी कामगिरी केली आहे. हजारो वैज्ञानिक, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या परिश्रमातून हे यश साकार झाले. स्कायरूटने ‘विक्रम-१’ला ‘कॅब टू स्पेस’ ही संकल्पना दिली आहे. त्यामुळे विविध कंपन्यांना कमी खर्चात आणि कमी कालावधीत उपग्रह अंतराळात पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.(Indian Rocket)
https://prahaar.in/2026/07/20/bmc-news-who-is-responsible-for-stalling-the-proceedings-of-the-municipal-corporation-house/
विक्रम-१’च्या यशस्वी उड्डाणाने भारताच्या अंतराळ क्षेत्राची ताकद सर्व जगाला दाखवून दिली आहे. आतापर्यंत देशातील अंतराळ क्षेत्रावर इस्रोचे वर्चस्व होते. मात्र, स्कायरूट एरोस्पेसने खासगी क्षेत्राची क्षमता सिद्ध करत भारताच्या व्यावसायिक अंतराळ उद्योगासाठी नवे दालन खुले केले. उड्डाणापूर्वी काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रक्षेपणाला विलंब झाला, तरी अखेर ‘विक्रम-१’ने यशस्वी झेप घेत खासगी उद्योगाचे सामर्थ्य सिद्ध केले. यापुढे स्कायरूटसमोर काही मोठी आव्हाने आहेत. लहान उपग्रह प्रक्षेपणाची जागतिक बाजारपेठ अत्यंत स्पर्धात्मक असून अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच रॉकेट निर्मिती आणि प्रक्षेपण हा मोठ्या भांडवली गुंतवणुकीचा उद्योग आहे. या आव्हानांवर मात करून भारत या क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण करेल, असा विश्वास ‘विक्रम-१’ने दिला आहे. देशातील खासगी क्षेत्राने विकसित केलेले पहिले कक्षीय रॉकेट, संपूर्ण कार्बन तंत्रज्ञानावर आधारित रॉकेट आणि भारतातील सर्वात लांब मोनोलिथिक कार्बन कॉम्पोझिट रॉकेट अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा ऐतिहासिक टप्पा असून, देशाची मान अभिमानाने उंचावणारी ही घटना ठरली आहे.