इराण : मध्य पूर्वेमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता इतर शेजारील देशांनाही बसू लागली आहे. एका अत्यंत धक्कादायक घडामोडीत, इराणने कुवेतच्या मुख्य वीज आणि समुद्राचे खारे पाणी गोड करणाऱ्या ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर भीषण हल्ला केल्याचा दावा कुवेतने केला आहे. शुक्रवारी कुवेत सरकारने अधिकृत निवेदन जारी करून या हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्यात प्लांटचे अतोनात नुकसान झाले असून, यामुळे संपूर्ण देशात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
https://prahaar.in/2026/07/17/rohit-sharma-bcci-will-give-pension-worth-lakhs-of-rupees-every-year-after-rohit-sharma-retired/
कुवेत हा एक छोटा आणि पूर्णपणे वाळवंटी देश आहे. या देशाची पिण्याच्या पाण्याची संपूर्ण भिस्त समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड करण्यावर अवलंबून आहे. देशातील तब्बल ९० टक्के पिण्याचे पाणी याच डिसॅलिनेशन प्रक्रियेतून मिळते. त्यामुळे या प्लांटवर झालेला हल्ला म्हणजे कुवैतच्या जीवनवाहिनीवर झालेला हल्ला मानला जात आहे. कुवेतच्या वीज, पाणी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या हल्ल्याची माहिती देताना सांगितले की, इराणच्या हल्ल्यानंतर प्लांटला भीषण आग लागली. या आगीत वीज निर्मिती करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे.कुवेत सरकारने अत्यंत चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘आमच्या देशात पाण्याचा दुसरा कोणताही नैसर्गिक स्त्रोत नाही. अशा परिस्थितीत वॉटर फिल्टर प्लांटमध्ये झालेला कोणताही बिघाड किंवा अडथळा या छोट्या वाळवंटी देशातील नागरिकांच्या अस्तित्वासाठी आणि जिवासाठी थेट धोका ठरू शकतो.’ दरम्यान, प्लांटला लागलेली आग आता विझवण्यात आली असून, नुकसानाचा अंदाज घेणे आणि प्लांट पुन्हा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
https://prahaar.in/2026/07/17/baramatis-shravani-kudale-shines-in-neet-2026-ranks-first-in-maharashtra-congratulated-by-deputy-chief-minister-sunetra-pawar/
अमेरिकेचे इराणवर थरकाप उडवणारे प्रतिहल्ले!
कुवेतवरील या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधातील आपली लष्करी कारवाई तीव्र केली आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ल्यांचा धडाका लावला. या एअर स्ट्राईकमध्ये अमेरिकेने इराणचे अनेक मोठे पूल आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. इतकेच नाही तर इराणच्या सर्वात महत्त्वाच्या बंदरावर असलेला मुख्य टावरही अमेरिकन फायटर जेट्सनी पाडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याचाच हा भाग असल्याचे बोलले जात आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’वरील इराणची पकड सैल करण्यासाठी आम्ही इराणच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.
https://prahaar.in/2026/07/17/devendra-fadnavis-survey-of-micro-small-and-medium-industries-will-be-conducted-in-the-state/
मिडल ईस्टमध्ये तणाव शिगेला
अमेरिका आणि इराणमधील या थेट युद्धामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. इराण आता अमेरिकेला पाठिंबा देणाऱ्या किंवा अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या शेजारील देशांना लक्ष्य करत असल्याचे कुवेतवरील हल्ल्यावरून स्पष्ट होत आहे. जर हा पाण्याचा प्लांट लवकर सुरू झाला नाही, तर कुवैतवर इतिहासातील सर्वात मोठे जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे.