Home ब्रेकिंग न्यूज NEET 2026 : बारामतीच्या श्रावणी कुदळेची NEET 2026 मध्ये चमक; महाराष्ट्रात प्रथम, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन

NEET 2026 : बारामतीच्या श्रावणी कुदळेची NEET 2026 मध्ये चमक; महाराष्ट्रात प्रथम, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन

0
NEET 2026 : बारामतीच्या श्रावणी कुदळेची NEET 2026 मध्ये चमक; महाराष्ट्रात प्रथम, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन

बारामती : नीट २०२६ (NEET 2026) परीक्षेत बारामतीच्या श्रावणी कृष्णकांत कुदळे (Shravani Kudale) हिने उल्लेखनीय यश मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने 720 पैकी 710 गुण मिळवले असून देशभरातील मुलींमध्येही अव्वल स्थान मिळवत बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे.

https://prahaar.in/2026/07/17/revised-schedule-for-voter-list-revision-announced-final-list-on-october-19/

श्रावणीच्या या यशाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी श्रावणीचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातही ती अशीच यशस्वी वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संवादादरम्यान सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांनी श्रावणीच्या यशामागे योगदान देणाऱ्या शिक्षकांचे आणि कुटुंबीयांचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://prahaar.in/2026/07/17/will-benefits-for-converted-tribals-be-stopped/

यावेळी त्यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. श्रावणीच्या यशाचा त्यांनाही अभिमान वाटला असता आणि त्यांचे आशीर्वाद तिच्यासोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 नीट मध्ये (NEET 2026) मध्ये मिळालेल्या या यशामुळे श्रावणी कुदळेचे राज्यभरातून कौतुक होत असून बारामतीसाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here