Home साप्ताहिक अर्थविश्व Family Care Tracker Scheme : कुटुंबांच्या आरोग्यनोंदी होणार डिजिटल; पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ योजनेचे फायदे जाणून घ्या

Family Care Tracker Scheme : कुटुंबांच्या आरोग्यनोंदी होणार डिजिटल; पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ योजनेचे फायदे जाणून घ्या

0
Family Care Tracker Scheme : कुटुंबांच्या आरोग्यनोंदी होणार डिजिटल; पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ योजनेचे फायदे जाणून घ्या

Family Care Tracker Scheme : आरोग्यसेवांचे डिजिटलीकरण करण्यासाठी आता ‘पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ योजना महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने ‘पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ या प्रकल्पाची सुरुवात केली. या योजनेचा उद्देश्य काय ?

योजनेचा उद्देश्य

संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची माहिती एकाच मंचावर उपलब्ध करून देणे

उपचारादरम्यान आवश्यक नोंदी शोधण्याच्या त्रासातून सामान्यांची मुक्तता करणे

महिला आणि मुलांच्या आरोग्य योजनांचे सुसूत्रीकरण करणे

https://prahaar.in/2026/07/17/momentum-for-the-sindhudurg-global-industrial-region-project-focus-on-industry-tourism-and-job-creation/

योजनेचा फायदा काय ?

अनेक कुटुंबांच्या वैद्यकीय नोंदी आजही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये किंवा कागदी फायलींमध्ये विखुरलेल्या असतात. त्यामुळे तातडीची वैद्यकीय गरज निर्माण झाल्यावर अचूक माहिती गोळा करणे कठीण होते. त्यामुळे ‘पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ (Family Care Tracker Scheme) या समस्येचे मोठ्या प्रमाणावर निराकरण करू शकतो. ‘पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर’ प्रणाली एखाद्या कुटुंबातील जन्मनोंदणी क्रमांक किंवा ‘आभा आयडी’ (ABHA ID) यांच्याशी जोडली जाईल. विविध सरकारी डेटाबेसमधील (जन्म नोंदणी, आरोग्य, पोषण आणि शिक्षण) माहितीही एकत्रित करेल. यात गर्भावस्थेतील अर्भकांना एक विशिष्ट आयडी दिला जाईल. ज्याद्वारे त्या मुलाच्या-युवकाच्या १८ वर्षांपर्यंत त्यांच्या आरोग्याची आणि सरकारी योजनांच्या माहितीचा डिजिटल मागोवा घेणे शक्य होईल. यामुळे देशातील कुटुंबांतील सदस्यांची आरोग्य प्रोफाइल, उपचारांच्या नोंदी आणि इतर महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

https://prahaar.in/2026/07/17/nashik-kumbhmela-municipal-corporation-prepares-to-redesign-70-major-traffic-junctions-in-the-city/

कसा मिळेल लाभ ?

डिजिटल नोंदींमुळे आपत्कालीन उपचारात होणारा विलंब टळेल

रुग्णाचा दीर्घकालीन आजार आणि वैद्यकीय इतिहास समजून घेणे डॉक्टरांना सोपे होईल

सरकारी आरोग्य योजनांचे लाभ मिळवून देण्याची प्रक्रियाही जलद होईल

कागदोपत्री नोंदींच्या फायली घेऊन रुग्णालयांमध्ये चकरा मारण्याची गरज कमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here