Home महाराष्ट्र नाशिक Nashik : जिल्हा परिषदेच्या शाळांतील गणवेश निकृष्ट दर्जाचे ; सीईओ ओमकार पवार अँ क्शन मोडमध्ये ; दिले ‘हे’ आदेश

Nashik : जिल्हा परिषदेच्या शाळांतील गणवेश निकृष्ट दर्जाचे ; सीईओ ओमकार पवार अँ क्शन मोडमध्ये ; दिले ‘हे’ आदेश

0
Nashik : जिल्हा परिषदेच्या शाळांतील गणवेश निकृष्ट दर्जाचे ; सीईओ ओमकार पवार अँ क्शन मोडमध्ये ; दिले ‘हे’ आदेश

Nashik : विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी आढळून आल्याचं जिल्ह्यात आढळून आल्याने प्रशासन खडबडुन जागं झालं आहे. राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या गणवेशात त्रुटी असल्याचं आढळून आल्यानं जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (CEO Omkar Pawar) यांनी संबंधित मुख्याध्यापकांना याप्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दली असून दोषींवर शासन नियमानुसार कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (CEO Omkar Pawar) यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध शाळांमधूनl गणवेशाचे नमुने संकलित करण्यात आले त्यानंतर या गणवेशांची मान्यताप्राप्त वस्त्रोद्योग परीक्षण संस्थेमार्फत गुणवत्ता तपासण्यात आली. आणि याच तपासणीत काही गोष्टी निदर्शनास आल्या. या तपासणीत प्रयोगशाळेच्या अहवालात शासनाने निश्चित केलेल्या कापडाच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.

https://prahaar.in/2026/07/16/deputy-speaker-sachin-ahir-is-deputy-speaker-sachin-ahir-upset-over-being-allotted-a-flat-instead-of-a-government-bungalow/

शासनाच्या सूचना काय ?

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडात पॉलिस्टर (Polyester) आणि कॉटनचे (Cotton) प्रमाण किमान ७०:३० किंवा ८०:२० असणे बंधनकारक आहे. मात्र बागलाण (Baglan) , सुरगाणा (Surgana) , चांदवड (Chandwad) आणि पेठ (Peth) तालुक्यातील १६ जिल्हा परिषद शाळांमधील गणवेशाच्या नमुन्यांमध्ये हे निकष पाळले गेले नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे आता या गोष्टींची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

काही नमुन्यांमध्ये शंभर टक्के पॉलिस्टर (Polyester)  आणि शून्य टक्के कॉटन (Cotton)  असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले, तर काही नमुन्यांमध्येही कॉटनचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अत्यल्प असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीईओ ओमकार पवार यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी (Sailatha Samaleti) यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

https://prahaar.in/2026/07/16/nandurbar-leopard-terror-in-the-heart-of-the-settlement/

शाळांना तातडीने नोटिसा बजावणार

दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाकडून (Primary Education Department) संबंधित शाळांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळावा आणि शासनाने निश्चित केलेल्या गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने दक्ष राहणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here