– एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार; नीलम गोऱ्हेंकडील बंगला अण्णा बनसोडे यांना बहाल
मुंबई : विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर (Deputy Speaker Sachin Ahir) यांना शासकीय बंगल्याचे वाटप करताना प्रशासनाकडून एकामागून एक दोन मोठे धक्के बसले असून, सुसज्ज बंगल्यांऐवजी फ्लॅट आवंटित झाल्याने ते नाराज आहेत. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडील ‘पुरंदर’ बंगला आपल्याला मिळेल अशी अपेक्षा असतानाच, महायुतीमधील अंतर्गत समीकरणांमुळे हा बंगला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आल्याने अहिर यांची नाराजी वाढली आहे. बंगल्याऐवजी प्रशासनाने सदनिका (फ्लॅट) दिल्यामुळे अहिर यांनी अद्याप तिथे राहण्यास जाणे टाळले असून, या संपूर्ण प्रकाराबाबत ते उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
https://prahaar.in/2026/07/16/nitesh-rane-air-service-between-navi-mumbai-and-sindhudurg-to-start-from-august-15-guardian-minister-nitesh-rane/
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या जागी सचिन अहिर (Deputy Speaker Sachin Ahir) यांची वर्णी लागल्यानंतर विधानभवनातील गोऱ्हे यांचे दालन अहिर यांना देण्यात आले. त्यामुळे गोऱ्हे यांच्या ताब्यातील शासकीय बंगलाही अहिर यांनाच मिळेल, असे राजकीय वर्तुळात गृहीत धरले जात होते. मात्र, प्रत्यक्षात बंगल्यांच्या वाटपावरून पडद्यामागे मोठे नाट्य घडले. सुरुवातीला सचिन अहिर यांना मंत्रालयासमोर असलेला ‘रायगड’ (ए-६) हा बंगला मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा बंगला सध्या एका वरिष्ठ नेत्याच्या वापरात असल्यामुळे हा निर्णय तडकाफडकी रद्द करण्यात आला.
https://prahaar.in/2026/07/16/isro-scientist-resignations-dos-tightens-exit-rules-for-gaganyaan-key-missions/
यानंतर सचिन अहिर (Deputy Speaker Sachin Ahir) यांनी नीलम गोऱ्हे यांच्या ताब्यात असलेल्या ‘पुरंदर’ (सी-३) या बंगल्यावर आपला दावा सांगितला होता. परंतु, तिथेही महायुतीमधील अंतर्गत समीकरणांमुळे मोठा ट्विस्ट आला. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही याच बंगल्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. अखेर प्रशासनाने हा पुरंदर बंगला अण्णा बनसोडे यांना बहाल केल्याने सचिन अहिर यांना दुसऱ्यांदा हुलकावणी मिळाली. दोन-दोन बंगल्यांवरून पत्ता कट झाल्यानंतर आता प्रशासनाने सचिन अहिर यांना मंत्रालयाशेजारील ‘सुनीती’ इमारतीमधील एक सदनिका (फ्लॅट) राहण्यासाठी दिली आहे. सुसज्ज बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्याने नाराज असलेल्या अहिर यांनी या सदनिकेचा ताबा घेतलेला नाही. या सर्व प्रकारामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये शासकीय बंगल्यांवरून नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. (Deputy Speaker Sachin Ahir)