कार्डिफ : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना सहा गडी राखून जिंकला होता. मालिकेतील दुसरा सामना गुरुवार, १६ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Shubham Gill )
https://prahaar.in/2026/07/16/water-crisis-water-crisis-in-the-state-persists-due-to-erratic-rainfall/
मालिकेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने दमदार ८० धावा केल्या होत्या. दुखापतीमुळे गिलला पहिल्या सामन्यात मैदान सोडावे लागले होते, पण पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर तो प्रेझेंटेशनसाठी आला होता. यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. तो दुसरा सामना खेळताना दिसू शकतो. सामन्यावेळी अधिकृत माहिती दिली जाईल.जर गिलला विश्रांती देण्यात आली तर, त्याच्या जागी ईशान किशनला रोहितसोबत सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते. (Ind vs Eng)
https://prahaar.in/2026/07/16/tragic-incident-at-arnala-beach-four-people-went-for-a-swim-and-met-with-tragedy-two-are-missing/
पहिल्या सामन्यात गुरुनूर ब्रारने दमदार गोलंदाजी केली होती. मात्र, ४८ व्या षटकात त्याला दुखापत झाली. यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावे लागले होते. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, टीम मॅनेजमेंट त्याला खेळवण्याची रिस्क घेणार नाही. जर तो पूर्णपणे फिट झाला नाही, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंग किंवा प्रिन्स यादवला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. (Rohit Sharma )
https://prahaar.in/2026/07/16/m-s-dhonis-radio-earwig-at-edgbaston-sparks-discussion-india-secures-a-resounding-victory-over-england/
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११
भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अर्शदीप सिंग/ प्रिन्स यादव , जसप्रीत बुमराह, प्रसिध्द कृष्णा.
इंग्लंडचा संघ : बेन डकेट, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), जो रूट, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद/साकीब महमूद.