Home क्रीडा Ind vs Eng : रोहित-विराट पहिल्या सामन्यासाठी सज्ज ! एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचं इंग्लंडवर वर्चस्व

Ind vs Eng : रोहित-विराट पहिल्या सामन्यासाठी सज्ज ! एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचं इंग्लंडवर वर्चस्व

0
Ind vs Eng : रोहित-विराट पहिल्या सामन्यासाठी सज्ज ! एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचं इंग्लंडवर वर्चस्व

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आज (१४ जुलै) पासून सुरू होत असून, पहिला सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टी-२० मालिकेत झालेल्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडवर सातत्याने आपले वर्चस्व कायम राखले आहे. (Rohit Sharma)

https://prahaar.in/2026/07/14/jalgaon-crime-a-mother-in-law-pushed-a-blind-woman-and-her-three-and-a-half-year-old-blind-son-into-a-well/

एकदिवसीय सामन्यात भारताचे वर्चस्व

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ११० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने ६१, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले असून, दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. इंग्लंडमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण ४४ सामने खेळले गेले आहेत. यात भारताने १६, तर इंग्लंडने २३ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.(Ind vs Eng)

https://prahaar.in/2026/07/14/ind-vs-eng-odi-englands-bold-move-opening-pair-changed-again-immense-faith-placed-in-three-spinners-against-india/

रोहित-विराट पुन्हा इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी करणार !

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ टी-२० मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. भारताची सर्वात मोठी समस्या त्यांची कमकुवत फलंदाजी होती, ज्यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजांकडून उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. रोहित आणि विराटच्या पुनरागमनामुळे संघाची फलंदाजीला अधिक मजबूती मिळेल. (Virat Kohli)

https://prahaar.in/2026/07/14/fifa-world-cup-2026-goals-glamour-and-billions-in-earnings-calls-of-love-stories-and-wealth-from-messi-to-mbappe/

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये नेहमीच शानदार कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडच्या मैदानावर २७ डावांमध्ये ६४.९१ च्या जबरदस्त सरासरीने १,४२८ धावा केल्या आहेत, तर एकंदरीत इंग्लंडविरुद्ध २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९०.७७ च्या स्ट्राइक रेट आणि ४७.०० च्या सरासरीने एकूण ८४६ धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.दुसरीकडे, विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध तब्बल ३८ एकदिवसीय सामने खेळले असून ३४ डावांमध्ये ४१.०८ च्या सरासरीने १,३९७ धावा फटकावल्या आहेत. या धावा ८८.२५ च्या स्ट्राइक रेटने बनवताना विराटने इंग्लंडविरुद्ध ३ शतके आणि १० अर्धशतके झळकावली आहेत.गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराहवर असेल. प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार हे वेगवान गोलंदाजीच्या फळीचा भाग असतील. दुखापतीमुळे हर्षितलाही एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा कुलदीप यादव सांभाळेल अशी अपेक्षा आहे. रवी बिश्नोईचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here