- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; होर्डिंग दुर्घटनेची घेतली गंभीर दखल
मुंबई : ठाण्यात सोमवारी घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ ठाणे महानगरपालिका आयुक्तांना फोन करून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत.
चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीचा अहवाल सादर ...
यासोबतच पावसाळ्यात वाऱ्या-पावासामुळे पुन्हा अशी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्सवर आणि बेकायदेशीर फलक लावणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. (DCM Eknath Shinde)
उपमुख्यमंत्र्यांच्या (DCM Eknath Shinde) या आदेशानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून सोमवारी रात्रीपासूनच शहरात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
View this post on Instagram






