FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाला (Argentina) सेमीफायनलचं (Semi-final) तिकीट मिळवून देण्यात लौतारो मार्टिनेज (Lautaro Martinez) याने निर्णायक भूमिका बजावली. सामना अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना आणि निकाल कोणत्याही बाजूने फिरू शकत असताना मार्टिनेजने केलेल्या महत्त्वाच्या गोलने (Goal) अर्जेंटिनाचा विजय जवळपास निश्चित केला. या गोलनंतर संपूर्ण फुटबॉल (Football) विश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू असून त्याचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
उंचीमुळे (Height) सुरुवातीला झाला नकार
लौतारो मार्टिनेजची उंची सुमारे ५ फूट ९ इंच आहे. लहानपणापासून त्याला उंचीमुळे अनेक टोमणे ऐकावे लागले. याच कारणामुळे प्रसिद्ध क्लब बोका ज्युनियर्सने (Boca Juniors) त्याला ट्रायलदरम्यान (Trial) नाकारलं. फुटबॉलसाठी आवश्यक उंची त्याच्याकडे नसल्याचं त्याला थेट सांगण्यात आलं.
https://prahaar.in/2026/07/13/wimbledon-2026-sinner-dominates-the-final-defeats-zverev-to-claim-second-consecutive-title/
अनेक नकारांनंतर फुटबॉल सोडण्याचा विचार
बोका ज्युनियर्सच नव्हे, तर इतर अनेक क्लबांकडूनही त्याला नकार मिळाला. सततच्या या निराशेमुळे त्याने फुटबॉल सोडण्याचाही विचार केला होता. मात्र त्याच्या आई-वडिलांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला. विशेषतः आईने त्याला सांगितलं की, फुटबॉलमध्ये उंचीपेक्षा जिद्द, ताकद आणि योग्य पोजिशनिंग (Positioning) अधिक महत्त्वाची असते. याच शब्दांनी त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली.
‘एल टोरो’ (El Toro) म्हणजेच ‘सांड’ हे नाव कसं मिळालं?
लौतारो मार्टिनेजला ‘एल टोरो’ (El Toro) म्हणजेच ‘सांड’ हे टोपणनाव (Nickname) त्याच्या आक्रमक खेळामुळे मिळालं. लहानपणी स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या मुलांविरुद्ध खेळताना तो कोणत्याही डिफेंडरला (Defender) घाबरत नसे. चेंडू (Ball) हिसकावून घेण्याची त्याची ताकद आणि आक्रमक शैली सांडसारखी असल्याने त्याला हे नाव मिळालं. त्याची हीच खेळण्याची शैली पुढे मोठ्या स्तरावरही कायम राहिली.
https://prahaar.in/2026/07/12/fifa-world-cup-south-african-player-returns-home-after-shining-at-the-fifa-world-cup-but/
आर्थिक अडचणींमध्येही पालकांनी जपलं स्वप्न
लौतारोचे वडील मारियो मार्टिनेज हे स्वतः फुटबॉलपटू (Footballer) होते. त्यामुळे प्रशिक्षण (Training), फुटबॉल किट (Football Kit) आणि बुटांचा खर्च किती मोठा असतो, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. मर्यादित उत्पन्न असूनही त्यांनी मुलाच्या स्वप्नाशी तडजोड केली नाही. अनेकदा त्यासाठी घरातील इतर गरजांमध्ये कपात करावी लागली. वडिलांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलाच्या प्रवासासाठी बस भाडं आणि प्रशिक्षण शुल्काची व्यवस्था केली. मात्र आई-वडिलांनी कधीही त्याला गरिबीची जाणीव होऊ दिली नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच लौतारो मार्टिनेज आज जागतिक फुटबॉलमधील (World Football) मोठं नाव बनलं आहे.