Home ब्रेकिंग न्यूज Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

0
Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी
Wari Robbers

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident) घडली. पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एका टेम्पोने (Tempo) वारकऱ्यांना धडक दिल्याने ३ वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे तर ४ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील जेजुरी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या गर्दीत अचानक एक टेम्पो घुसला. या धडकेत (Collision) ४ वारकरी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या (Administration) मदतीने जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक (Medical Team) लक्ष ठेवून आहे.

https://prahaar.in/2026/07/13/ashadhi-wari-2026-two-nurses-suffer-food-poisoning-from-soft-drinks-brought-for-distribution-during-the-pilgrimage-food-and-drug-administration-takes-immediate-action/

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान (Journey) करत होती. जेजुरीत पालखीचे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने भंडाऱ्याची उधळण केली जाते. मात्र, त्याआधीच मार्गावर ही दुर्घटना घडल्याने वारकरी आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा पुढील तपास (Investigation) संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here