Home ब्रेकिंग न्यूज Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली’च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली’च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

0
Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली’च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे – सासवड, दि. १२ जुलै – अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज सासवड येथील पालखी तळावर जाऊन जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. ‘माऊली’च्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

https://prahaar.in/2026/07/12/swapnapurti-housing-project-launched-in-nagpur-sanitation-workers-to-receive-free-homes-chief-minister-fadnavis/

 

 

वारीच्या समतेच्या आणि सेवाभावाच्या परंपरेला अभिवादन करत सुनेत्रा अजित पवार यांनी वारकरी आणि पालखी प्रमुखांसमवेत जमिनीवर बसून सहभोजन केले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या वारीतील अनुभव जाणून घेतले. भक्ती, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या पवित्र परंपरेचा त्यांनी आत्मियतेने अनुभव घेतला.

 

यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here