ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने
ठाणे : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद कारवाई करत घरातून चोरीला गेलेले सुमारे ३.५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अवघ्या एका तासात शोधून काढत मालकिणीच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळबड रोडवरील रुणवाल नगर येथे राहणाऱ्या अनुजा अजित सावंत (वय ५८) यांच्या घरातून अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच दिवशी डीप-क्लिनिंगसाठी आलेल्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यावर त्यांचा संशय गेला. ही सेवा त्यांनी एका ऑनलाइन ॲपद्वारे बुक केली होती. (Crime News)
https://prahaar.in/2026/07/12/swapnapurti-housing-project-launched-in-nagpur-sanitation-workers-to-receive-free-homes-chief-minister-fadnavis/
तक्रार मिळताच राबोडी पोलिसांनी ॲपवरील नोंदणी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित महिलेचा शोध घेत तिला चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान तिने कथितरित्या चोरीची कबुली दिली आणि चोरलेले मंगळसूत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. (Thane Police)
मात्र, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मंगळसूत्र परत मिळाल्यानंतर तक्रारदार अनुजा सावंत यांनी संबंधित महिलेविरुद्ध औपचारिक गुन्हा दाखल न करण्याची विनंती पोलिसांकडे केली.
https://prahaar.in/2026/07/12/jamkhed-crime-dispute-over-a-trivial-matter-at-a-wedding-talathi-attacks-with-a-microphone-youth-seriously-injured/
आरोपी महिलेचे कमी वय आणि गुन्हा नोंद झाल्यास तिच्या भविष्यातील करिअरवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तक्रारदारांनी तिला माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला कडक समज देऊन सोडून दिले.
या संपूर्ण प्रकरणात राबोडी (Rabodi) पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे तसेच तक्रारदारांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.