Home साप्ताहिक रिलॅक्स भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

0
भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ (thumpN) अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रम शोधण्याची आणि तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी, वैयक्तिक आणि संवादाधारित करण्याचा या व्यासपीठाचा उद्देश आहे.भारतातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रात दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या टीमने थम्पएनची निर्मिती केली आहे. संगीत मैफल, स्टँड-अप कॉमेडी, नाईटलाइफ, क्रीडा स्पर्धा, महोत्सव तसेच विविध प्रादेशिक कार्यक्रम एका व्यासपीठावर उपलब्ध करून देत हे अ‍ॅप वापरकर्त्यांच्या आवडीनुसार कार्यक्रमांची शिफारस करते.

दरवर्षी देशातील ३१९ शहरांमध्ये ४० हजारांहून अधिक लाइव्ह कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, या कार्यक्रमांची माहिती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मेसेजिंग गट आणि इतर माध्यमांमध्ये विखुरलेली असल्याने प्रेक्षकांना योग्य कार्यक्रम शोधणे कठीण जाते. आयोजकांनाही आपल्या कार्यक्रमांपर्यंत अधिकाधिक प्रेक्षक पोहोचविण्याचे आव्हान असते. हीच दरी भरून काढण्यासाठी थम्पएन विकसित करण्यात आले आहे.या व्यासपीठाच्या केंद्रस्थानी ‘शॅडो’ (Shadow) हा संवादक्षम एआय सहाय्यक आहे. पारंपरिक शोधपद्धतीऐवजी नैसर्गिक संवादाद्वारे तो वापरकर्त्यांच्या आवडी, बजेट, ठिकाण आणि अपेक्षित अनुभव समजून त्यानुसार योग्य कार्यक्रमांची शिफारस करतो. विविध स्रोतांमधील कार्यक्रमांचे विश्लेषण करून तो संदर्भानुरूप पर्याय उपलब्ध करून देतो.शॅडोला अधिक सक्षम बनविण्यासाठी कलाकार, कार्यक्रम आयोजक, स्थळ व्यवस्थापक आणि विविध मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञांचे जाळे कार्यरत आहे. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे आणि सांस्कृतिक जाणिवेमुळे एआयकडून दिल्या जाणाऱ्या शिफारसी अधिक अचूक आणि उपयुक्त ठरतात.

थम्पएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण खरे यांनी सांगितले की, कार्यक्रम शोधण्याची प्रक्रिया आज अनेक माध्यमांमध्ये विखुरलेली आहे. लाइव्ह मनोरंजन क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार आणि ग्राहकांचा एआय-आधारित, संवादप्रधान अनुभवांकडे वाढता कल लक्षात घेऊन थम्पएन विकसित करण्यात आले आहे.”वापरकर्ते शॅडोला ‘या आठवड्याच्या शेवटी १,५०० रुपयांच्या आत स्टँड-अप शो सुचव’ किंवा ‘रविवारी संपूर्ण कुटुंबासाठी कार्यक्रम शोध’ असे सहज विचारू शकतात. शॅडो त्यांच्या गरजा आणि आवडी समजून योग्य पर्याय सुचवतो. याशिवाय आयोजकांनाही कार्यक्रमांचे नियोजन, प्रसार आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक तांत्रिक सुविधा उपलब्ध होतात,” असे खरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here