Home संपादकीय अग्रलेख लोकसंख्येबाबत जागरूकता महत्त्वाची

लोकसंख्येबाबत जागरूकता महत्त्वाची

0
लोकसंख्येबाबत जागरूकता महत्त्वाची
inda

लोकसंख्या वाढ, प्रजनन, आरोग्य आणि शाश्वत विकास या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो. ११ जुलै, १९८७ रोजी जगाच्या लोकसंख्येने ५ अब्जाचा टप्पा पार केला, तेव्हा त्यावेळच्या ‘फाईव्ह बिलियन डे’ या घटनेने निर्माण केलेल्या जागतिक उत्सुकतेतून प्रेरणा घेऊन १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात करण्यात आली.

https://prahaar.in/2026/07/11/crackdown-continues-in-full-swing-in-ahilyanagar/

आज आपण ३९ व्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढत्या लोकसंख्येसंबंधित गंभीर समस्यांबद्दल देशात जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य, व्याख्याने, घोषवाक्य, निबंध स्पर्धा, पोस्टर्स लावणे व जनजागृतीसाठी रॅली काढणे अशा विविध कार्यक्रमांनी जनजागृती केली जाणार आहे. मुख्य उद्देश आहे की, देशातील वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच कुटुंब नियोजन आणि माता आरोग्याबाबत लोकांना शिक्षित करणे होय. त्यामुळे लोकसंख्येबाबत जागरूकता आजही महत्त्वाची आहे. आज लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश जगात नंबर वन झाला असला तरी ज्या प्रमाणात लोकसंख्येबाबत जागरूकता व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेली दिसत नाही. त्याला कारण आपण सर्वजण आहोत. केवळ लोकसंख्या दिन साजरा करून चालणार नाही तर खऱ्या अर्थाने लोकांमध्ये वाढत्या लोकसंख्येबाबत जागरूकता निर्माण करावी लागेल. जागतिक लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे आपल्या समोर आव्हाने निर्माण होत आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या गरजांवर होतो. मानवाच्या गरजा अमर्यादित व साधने मर्यादित हे आपण अर्थशास्त्रात शिकलो आहोत. याचा परिणाम आपल्या विकसनशील देशामध्ये दिसून येतो. त्यासाठी लोकसंख्या शिक्षणाची खरी गरज आहे.

https://prahaar.in/2026/07/11/stop-the-business-of-spreading-rumors-navnath-ban-lashes-out-at-sanjay-raut-over-remarks-regarding-the-presidential-system/

माता आरोग्य सेवा, गर्भनिरोधक साधने आणि आरोग्यविषयक उपक्रमांची उपलब्धता सुधारण्यासाठी शासनस्तरावर काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे यातूनच वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण येऊ शकते. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम होताना दिसतात. आरोग्य सेवेचा विचार करता दवाखान्यात गर्दी होते. गर्दी झाल्याने उपचारासाठी विलंब होतो. विलंब झाल्याने अत्यावश्यक सेवा वेळीच मिळत नाही. याचा परिणाम आरोग्य सेवेवर ताण पडल्याने अत्यावश्यक सेवा असुरक्षित ठरतात. यामुळे आरोग्यसेवा, पोषण आहार व लसीकरण वेळेवर होत नाही. म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सेवेची कमतरता भासते. यात माता आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. तसेच अस्वच्छता दिसून आल्याने संसर्गजन्य रोगाचा प्रसार वाढू शकतो. मुख्य म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे स्वच्छ पाणी, अन्न आणि ऊर्जा यांची मागणी वाढते. ज्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या संसाधनांवर ताण पडतो. वाहने, कचरा आणि औद्योगिक क्रिया प्रकल्प वाढल्याने हवा आणि जलप्रदूषण होते याचा दीर्घकालीन परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. लोकांच्या निवाऱ्यासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी जंगले तोडली गेल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होत असतो. तेव्हा लोकसंख्या वाढीवर आळा घालण्यासाठी आणि आरोग्याच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य शिक्षण महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला किती मुले असावीत याची जाणीव निर्माण झाल्याने ते स्वत: निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजनामुळे आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होते, याचा परिणाम कौटुंबिक वातावरण अधिक निरोगी रहाते. तेव्हा लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यामुळे लोकसंख्येचा विकास सर्वसमावेशक व पर्यावरणाचे रक्षण होण्याला मदत होते. यासाठी दारिद्र्य निर्मूलन, उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छ पाणी, लिंग भेद आणि वातावरण या उद्दिष्टांची योग्यप्रकारे पूर्तता करावी लागेल.

https://prahaar.in/2026/07/11/aamir-khans-third-marriage-%e2%82%b9100-crore-investment-separate-floors-for-all-three-wives-buzz-surrounds-aamir-khans-new-home/

जगाची लोकसंख्या अंदाजे ८.३० अब्ज असून संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार सध्याचा जागतिक लोकसंख्या वाढीचा दर ०.८३ टक्के दरवर्षी आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या अंदाजे १.४७ अब्ज असून महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या अंदाजे १२.९३ कोटी आहे. तेव्हा देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता लोकसंख्या वाढीवर नियंत्रण झालेच पाहिजे. त्यासाठी कुटुंब नियोजन सेवांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. तरुणाईला त्यांचे हक्क, त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी प्रजनन आरोग्य शिक्षण देण्यात यावे. महिलांना प्रजनन आरोग्याविषयी शिक्षण देऊन विवाह उशिरा करण्यासाठी प्रोत्साहन देणे, छोटे कुटुंब सुखी कुटुंब यासाठी शासन पातळीवर आर्थिक प्रोत्साहन देणे, महिलांबरोबर पुरुषांचा सुद्धा कुटुंब नियोजनात सहभाग करून घ्यावा. तेव्हा देशातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे ही आपली सर्वांची जाबाबदारी आहे. म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढीला आळा बसेल. लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती आणि आरोग्याला चालना देण्यात आपल्या राज्यातील आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये विशेषत: महिलांच्या आरोग्याची काळजी व योग्य मार्गदर्शन दिले जाते. कुटुंब नियोजना संदर्भात महिलांना वैयक्तिक समुपदेशन करण्यात येते. महिलांना आरोग्य शिक्षण आणि आरोग्यविषयक शिबीर आयोजित केली जातात. तसेच शाळा आणि महाविद्यालयात मुला-मुलींमध्ये प्रजनन आरोग्याबाबत शिक्षणाचा प्रसार करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या निवडीबाबत जागरूकता वाढविण्याचे काम आरोग्य विभाग करीत असतात. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार करता ग्रामीण भागात अशा सोयीसुविधा होणे गरजेचे आहे.

https://prahaar.in/2026/07/11/does-the-sight-of-a-lizard-on-the-wall-make-you-shudder-try-these-effective-home-remedies-instead-of-chemical-sprays/

आजच्या जागतिक लोकसंख्या दिनी आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यावर योग्य उपाय सुचविण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला प्रोत्साहन मिळते. तेव्हा जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या वाढ आणि निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करता वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आपल्या देशात जागरूकता महत्त्वाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here