Home ब्रेकिंग न्यूज BMC : मुंबईतील दुघर्टनांवर चर्चा, पण उबाठाचे रामाच्या नावाने राजकारण

BMC : मुंबईतील दुघर्टनांवर चर्चा, पण उबाठाचे रामाच्या नावाने राजकारण

0
BMC : मुंबईतील दुघर्टनांवर चर्चा, पण उबाठाचे रामाच्या नावाने राजकारण
UBT

सभागृहात मुंबईतील दुघर्टनांवर बोलण्याऐवजी रामाच्या नावाच्या घोषणा देत घातला गोंधळ

मुंबई : मुंबईत पावसाळ्यातील (Mumbai Rains) दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालिन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये उबाठाने (UBT) रामाच्या नावाने राजकारण करायला सुरुवात केली. आजवर रामाचे नाव न घेणाऱ्या उबाठाने सभागृहात आल्यापासून ते पुढे जय श्री राम… राम मंदिरकें चोरोंको, जुते मारो सालोंको अशा घोषणा देत मुंबईकरांच्या जिवनाशी निगडीत मुद्दयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील २५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या उबाठाने मुंबईचे वाट लावली असून त्यांना आता त्यावरही उपाययोजना सुचवण्यासाठी त्यावर राजकारण करण्यात अधिक स्वारस्य असल्याचे दिसून आले.

https://prahaar.in/2026/07/11/actor-prashant-damle-the-municipal-corporation-has-entrusted-a-new-responsibility-to-actor-prashant-damle/

मुंबई महापालिकेत मनसे गटनेते यशवंत किल्लेदार, काँग्रेसचे अश्रफ आझमी, उबाठाच्या श्रध्दा जाधव आणि टी जगदिश यांच्या मागणीनुसार विशेष सभेचे आयोजन महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी केले होते. या विशेष सभेमध्ये उपस्थित राहिल्यानंतर उबाठाच्या नगरसेवकांनी जय श्री राम यांच्या नावाने घोषणा देण्यास सुुुरुवात केली. उबाठाच्या घोषणांनंतर भाजपच्या नगरसेवकांनीही जय श्री रामच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृहातील कामकाजाला वेगळेच वळण लागले. त्यामुळे या गोंधळात आयुक्तांच्या उपस्थित न राहण्याच्या मुद्दयावरून अधिक गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर महापालिका सभागृहात १० मिनिटाकरता सभा तहकूब करण्यात आले.

सभागृहात मुंबईत उद्भवणाऱ्या पावसाळ्यातील दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन केलेले असल्याने यावर सर्व सदस्यांकडून साधक बाधक चर्चा होणे आणि उपाययोजना सुचवणे आवश्यक होते. पण उबाठाने या विषयाला भलतीकडे वळवून हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला. उबाठाला मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत चिंता नसून त्यांना राजकारणात अधिक स्वारस्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. डोक्यावर भगव्या आणि पांढऱ्या टोप्या घालून त्यांनी रामाच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे उबाठाला जिथे या मुद्दयावर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची संधी होती, तिथे उबाठाने रामाच्या नावाचा गजर करत सत्ताधारी पक्षाला यांच्या चुका दाखवून उपायोजना काय करायच्या याची संधी हातची घालवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here