Home देश Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांची भेट

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांची भेट

0
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांची भेट

मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, लोकसंपर्क तसेच उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.(Narendra Modi)

https://prahaar.in/2026/07/09/monsoon-update-the-state-has-received-an-average-rainfall-of-332-mm-since-june-1st-during-this-monsoon-season/

अल्बानीज यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी  (Narendra Modi) भारत-ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम आणि इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस रिसेप्शन कार्यक्रमात सहभाग घेतला.सीईओ फोरमला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज या सभागृहात भारत आणि ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक ताकद आणि महत्त्वाकांक्षा एकत्रितपणे दिसून येत आहे. सध्या जग अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि ऊर्जा संकटासारख्या आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलियाने नैसर्गिक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून एकत्र पुढे जाणे केवळ स्वाभाविकच नाही, तर अत्यंत आवश्यकही आहे.”(Narendra Modi)

https://prahaar.in/2026/07/09/taarak-mehta-ka-ooltah-chashma/

पंतप्रधान मोदी बुधवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाले होते. यावेळी भारतीय समुदायाने त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. स्वागत समारंभात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे विविध रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ऑस्ट्रेलियन-इंडिया  (Australia – India ) ऑर्केस्ट्राची प्रस्तुती होती. ऑर्केस्ट्राने ‘माँ तुझे सलाम’ हे गीत सादर केले, ज्याचे पंतप्रधान मोदी यांनी विशेष कौतुक केले.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, “ऑस्ट्रेलियन-इंडिया ऑर्केस्ट्राने सादर केलेले ‘माँ तुझे सलाम’ हे भावपूर्ण सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. संगीत आपल्या दोन देशांतील लोकांमधील नाते अधिक दृढ कसे करते, याचे हे सुंदर उदाहरण आहे. या अविस्मरणीय सादरीकरणासाठी ऑर्केस्ट्राच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन. तसेच, आपण ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनाचे स्मरण करत असताना, ही प्रस्तुती त्याच्या जागतिक लोकप्रियतेचीही साक्ष देते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/09/gauri-sprat-aamir-khans-special-ring-for-gauri-spratt/

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पारंपरिक वाद्य ‘डिजेरिडू’ आणि भारताच्या तबल्याची अनोखी जुगलबंदीही अनुभवली. ही प्रस्तुती डिजेरिडू वादक रॉन मरे आणि तबलावादक डॉ. सॅम इव्हान्स यांनी सादर केली.या कार्यक्रमाची छायाचित्रे शेअर करत मोदी म्हणाले, “ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन डिजेरिडू आणि भारताच्या तबल्याची ही अप्रतिम मैफल अनुभवणे अत्यंत विशेष होते. या दोन कालातीत वाद्यांच्या सुरेल संगतीतून आपल्या दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांचे सुंदर दर्शन घडले.”यासोबतच त्यांनी दोन्ही कलाकारांचे पारंपरिक संगीत जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केलेदरम्यान, ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियाचा दौरा पूर्ण केला होता. दौऱ्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, ऑस्ट्रेलिया दौरा संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, लोकांमधील संपर्क, उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, क्रीडा तसेच क्रीडा विज्ञान या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.ऑस्ट्रेलियातील कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात न्यूझीलंडकडे रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here