Home महाराष्ट्र नाशिक Nashik rain alert : पालखेड धरणातून पाणी सोडण्याची शक्यता; कादवा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik rain alert : पालखेड धरणातून पाणी सोडण्याची शक्यता; कादवा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
Nashik rain alert : पालखेड धरणातून पाणी सोडण्याची शक्यता; कादवा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पालखेड धरण प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 6 जुलैपासून परिसरात अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता लक्षात घेता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यास धरणातून कादवा नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते.

https://prahaar.in/2026/07/07/heavy-rain-warning-schools-and-colleges-in-mumbai-and-several-other-districts-closed-today/

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणातील पाणीसाठा आणि पाण्याची आवक याचा आढावा घेऊन वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल. आवश्यकतेनुसार पालखेड धरणातून (Palakhed Dam) टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

यामुळे कादवा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे. तसेच पशुधन, शेतीसाठी वापरले जाणारे मोटार पंप आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे प्रशासनाने सांगितले आहे. (Maharashtra Rain)

स्थानिक प्रशासन आणि संबंधित शासकीय विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीनुसार पुढील सूचना जारी केल्या जातील.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here