Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात धोक्याची घंटा वाजली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धबधबे उग्र रूप धारण करत आहेत, तर नद्या-ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशानुसार सांदनदरी, रतनगड, हरिश्चंद्रगड, भैरवगड, हापट्याचा कडा, अलंग, कुलंगगड, मलंग, रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व धोकादायक पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. (Entry ban at tourist spots)
https://prahaar.in/2026/07/07/513-mm-recorded-in-mahabaleshwar-in-24-hours/
घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद
वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी ही माहिती देताना पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे बंदीचे उल्लंघन करू नये, असे आवाहन केले आहे. सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने भंडारदरा पाणलोट क्षेत्राला झोडपून काढले. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत घाटघर येथे तब्बल ३२१ मिमी, रतनवाडी ३०२ मिमी, पांजरे २७० मिमी, वाकी १७३ मिमी, निळवंडे १४५ मिमी, अकोले ९३ मिमी आणि आढळा येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून भंडारदरा धरणाचा साठा ५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर निळवंडे धरणाचा साठाही २५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. (Entry ban at tourist spots)
https://prahaar.in/2026/07/07/tukaram-maharaj-palkhi-sohala-2026-pimpri-chinchwad-is-all-set-to-welcome-the-palkhis-of-tukobaray-and-mauli/
पर्यटनस्थळांवर तात्पुरती बंदी
कृष्णावंती नदीला आलेल्या प्रवाहामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात ५६०४ दशलक्ष घनफूट, निळवंडे धरणात २११६ दशलक्ष घनफूट आणि आढळा धरणात ३८९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा नोंदविण्यात आला. अंबित, पिंपळगाव खांड आणि वाकी हे लघु पाटबंधारे तलाव यापूर्वीच भरले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या परिसरात दाखल होतात. मात्र अनेक पर्यटक आवश्यक ती खबरदारी घेत नसल्याने अपघाताचा धोका वाढतो. याच पार्श्वभूमीवर वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर तात्पुरती बंदी लागू केली आहे.
https://prahaar.in/2026/07/07/major-irregularities-in-ramai-awas-yojana-an-attempt-to-misappropriate-houses-by-attaching-fake-ration-cards-and-tax-receipts-bearing-the-names-of-the-chief-minister-and-deputy-chief-minister/
लहित खुर्द–लहित बुद्रुक संपर्क तुटला
मुळा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे लहित खुर्द व लहित बुद्रुक या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिक व वाहनचालकांनी जीव धोक्यात घालून पुलावरून ये-जा करू नये, असे आवाहन केले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.