Home महाराष्ट्र नाशिक Nashik Rain Update : पुढील 3 तास नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस, 60-70 वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता

Nashik Rain Update : पुढील 3 तास नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस, 60-70 वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता

0
Nashik Rain Update : पुढील 3 तास नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस, 60-70 वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता
Rain Alert

Nashik Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. आजही नाशिकसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. आज नाशिक जिल्ह्यासह रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे.

https://prahaar.in/2026/07/06/landslide-hits-house-in-punes-maval-taluka-family-feared-trapped-ndrf-rescue-operation-underway/

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

पुढील तीन तासांत नाशिक जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस आणि ताशी 60-70 वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

https://prahaar.in/2026/07/06/heavy-rain-warning-for-mumbai-private-offices-advised-to-allow-work-from-home-government-offices-to-operate-for-half-a-day/

तर दुसरीकडे मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी काही तासांत अती मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here