मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या म्हणजेच मंगळवार ७ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाची तीव्रता लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील शाळांना थेट १२ जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Heavy Rain in Mumbai Pune)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि परिसरात मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडू शकतात, तसेच ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Heavy Rain in Mumbai Pune)
https://prahaar.in/2026/07/06/mumbai-rain-mumbai-battered-by-heavy-rainfall-trees-fell-at-291-locations-and-walls-and-houses-were-damaged-at-22-locations-warning-issued-for-very-heavy-rain-over-the-next-24-hours/
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबई, ठाणे आणि इतर संवेदनशील भागांमध्ये महानगरपालिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Heavy Rain in Mumbai Pune)
दरम्यान, पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या काळात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy Rain in Mumbai Pune)
https://prahaar.in/2026/07/06/indrayani-river-floods-government-issues-important-appeal-to-warkaris-administration-urges-people-not-to-visit-alandi/
View this post on Instagram