Nashik News : नाशिक शहरात मंगळवारी तसेच बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी (दि. 1) मेन रोड परिसरातील धुमाळ पॉईंट येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास धोकादायक स्थितीतील जुना वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. वाडा पूर्वीच रिकामा करण्यात आल्याने सुदैवाने याठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
https://prahaar.in/2026/07/01/nashik-crime-husband-commits-suicide-driven-to-despair-by-wifes-harassment/
शहरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार झाला, या पावसानंतर हा वाडा कोसळला असावा असा अंदाज आता व्यक्त होत आहे. संबंधित वाडा महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होता. त्याबाबत मालकाला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे वाडा रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली. मनपाच्या सजगतेमुळे आणि वास्तव करणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, तळमजल्यावरील दुकानांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान घटनेत काही आर्थिक नुकसान झाले का ? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
https://prahaar.in/2026/07/01/ashok-kharat-case-trial-begins-in-sessions-court-with-105-witnesses/
घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विनायक पांडे, नगरसेविका अदिती पांडे, ऋतुराज पांडे तसेच महापालिकेच्या अग्निशमन दल, बांधकाम विभाग आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले असून उर्वरित धोकादायक भाग पाडण्याची कारवाई प्रशासनाने हाती घेतली आहे.