Nashik : नाशिकच्या सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC) परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर दगड, लाथाबुक्क्या आणि ठोशांचा मारा करत जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला हप्ता न दिल्याच्या वादातून झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/29/we-will-strive-to-ensure-speedy-justice-in-serious-cases-like-nasrapur/
नेमकं काय घडलं ?
सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC) परिसरातील शानकार कंपनीसमोर ही थरारक घटना घडलीय. संतोषीमाता नगर येथे राहणारे प्रवीण बोंबले (Pravin Bombale) यांच्यावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. माहितीनुसार, हल्लेखोर मोटारसायकलींवरून घटनास्थळी आले होते. काही जण आधीपासूनच दबा धरून बसले होते. प्रवीण बोंबले समोर येताच त्यांना घेरण्यात आले आणि दगड, लाथाबुक्क्या तसेच ठोशांनी बेदम मारहाण करण्यात आली. बोंबले यांच्या मदतीसाठी काही मित्र धावून आले. मात्र, हल्लेखोरांकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे त्यांनाही मागे हटावे लागल्याचे सांगितले जात आहे.
https://prahaar.in/2026/06/29/sant-nivruttinath-maharajs-palkhi-departs-for-pandharpur/
‘हप्ता’ वादातून मारहाण झाल्याचा आरोप
या प्रकरणानंतर बोंबले यांचे मित्र विशाल साबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीनगर कार्बन नाका आणि म्हसोबा मंदिर परिसरात फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे काही तरुणांकडून सातत्याने हप्त्याची मागणी केली जात होती. विशाल साबळे यांचा दावा आहे की, हप्ता देणे बंद केल्यानंतर संबंधितांकडून धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्याच वादाचे पर्यवसान प्रवीण बोंबले यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
https://prahaar.in/2026/06/29/all-exams-including-tet-to-be-held-online-starting-next-year/
सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवीण बोंबले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Satpur Police Station) करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हप्ता न दिल्यामुळेच हा हल्ला झाला की यामागे इतर काही कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/29/nashik-tcs-case-major-evidence-emerges-in-the-nashik-conversion-case/
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे सातपूर एमआयडीसी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात पोलिस तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.