Home देश Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

0
Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण! 

हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल पंपावर (Petrol Pump) डिझेल भरून पैसे न देता स्कॉर्पिओ चालक फरार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २५ जून रोजी उशिरा रात्री पटौदी-बिलासपूर मार्गावरील यश फ्युएल स्टेशन येथे घडली. संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री सुमारे ११:५९ वाजता काळ्या रंगाची स्कॉर्पिओ-एन पेट्रोल पंपावर आली. वाहनात तीन जण होते. चालकाने सुमारे ६,००० रुपयांचे डिझेल भरून घेतले. त्यानंतर कर्मचाऱ्याने पेमेंट मशीन आणण्यासाठी वळताच चालकाने गाडी वेगाने पंपाबाहेर नेली. (Petrol Pump News)

https://prahaar.in/2026/06/28/a-heart-wrenching-accident-she-got-off-the-bus-and-the-moment-she-crossed-the-road-a-horrific-incident-occurred/

घटना इतक्या वेगाने घडली की कर्मचाऱ्याला वाहनातून इंधन भरण्याचे नोझलही काढता आले नाही. त्याने तातडीने दुचाकीवरून स्कॉर्पिओचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन भरधाव वेगाने निघून गेल्याने ते पकडता आले नाही.

तपासादरम्यान पोलिसांना समोर आले की, स्कॉर्पिओला पुढील बाजूस नंबर प्लेट नव्हती. मागील नंबर प्लेटही टेपने झाकण्यात आली होती. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी उपलब्ध फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे वाहनाचा शोध सुरू केला आहे.

पेट्रोल पंप व्यवस्थापनाने या प्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी आणि संबंधित वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

https://prahaar.in/2026/06/28/koyta-wielding-man-at-chhatrapati-shivaji-maharaj-terminus-major-tragedy-averted-thanks-to-the-police/

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून अनेकांनी या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here