तिरुवनंतपुरम : केरळमधील त्रिशूर येथे अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेने कारने प्रवास करताना दोन ग्रॅम सिंथेटिक ड्रग्ज आपल्या गुप्तांगात लपवून ठेवल्याची माहिती जिल्हा अँटी-नार्कोटिक(Anti-narcotic) स्पेशल ॲक्शन फोर्सला मिळाली होती.
त्रिशूरमधील वणियमपारा येथे वाहन तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी पलक्कड येथील एका रिसॉर्टमधून त्रिशूरकडे येणारी स्विफ्ट कार अडवली. कारमधून शिफास (२६), विद्या (२८), जिष्णू (२७) आणि श्रीलक्ष्मी (२०) यांना अटक करण्यात आली. हे सर्वजण गुरुवायूर-पावरट्टी परिसरातील रहिवासी आहेत.
https://prahaar.in/2026/06/28/wow-what-a-clever-move-filled-the-car-with-diesel-worth-%e2%82%b96000-and-sped-off-instantly/
तपासणीदरम्यान एका महिलेच्या गुप्तांगात लपवून ठेवलेले दोन ग्रॅम एमडीएमए (MDMA) जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शिफासच्या घरावर छापा टाकून आणखी १८ ग्रॅम एमडीएमए जप्त केले.
त्यानंतर तपासादरम्यान पोलिस चावक्कड येथील पंचारामुक्कू परिसरातील अॅल्युमिनियम उत्पादनाच्या एका कार्यशाळेपर्यंत पोहोचले. या ठिकाणी पोलिसांनी आणखी २८८ ग्रॅम एमडीएमए जप्त केले. हे अंमली पदार्थ एका कव्हरमध्ये ठेवलेल्या तीन वेगवेगळ्या पाकिटांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते.
https://prahaar.in/2026/06/28/railway-police-decision-following-the-murder-of-a-local-train-commuter-luggage-to-be-checked-at-stations/
या प्रकरणात पुढील तपासादरम्यान शब्बीर (३४), अनशाद (३१) आणि टी. टी. सुमेष (२५) यांनाही अटक करण्यात आली. हे तिघेही अमली पदार्थांच्या रॅकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोबाईल फोनमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी इतर आरोपींचा माग काढत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात यश मिळवले.
या संपूर्ण कारवाईत एकूण ३०८ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले असून, त्रिशूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.