Home ब्रेकिंग न्यूज TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

0
TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप
TET Paper Leak

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे. पेपरफुटीची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (TET Paper Leak)

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड हॉटेलमध्ये टीईटी प्रश्नपत्रिकेबाबत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. मात्र, संशयित तेथून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. (TET Paper Leak)

प्राथमिक चौकशीत संशयितांकडून टीईटी परीक्षेतील प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तिन्ही आरोपींना भिवंडीत आणण्यात आले असून त्यांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (TET Paper Leak)

https://prahaar.in/2026/06/27/another-setback-for-teacher-recruitment-tet-paper-leaked-just-a-day-before-the-exam-tomorrows-exam-temporarily-postponed/

लाखो उमेदवारांवर परिणाम :

पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी २८ जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे. (TET Paper Leak)

राज्यातील ३७ शहरांतील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. सुमारे ६ लाख १२८ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार असून त्याच परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेतली जाईल. (TET Paper Leak)

https://prahaar.in/2026/06/27/ketan-agrawal-murder-case-new-twist-in-the-ketan-agrawal-case-public-prosecutor-ujjwal-nikam-takes-charge-of-the-matter/

राजकीय प्रतिक्रिया :

टीईटी पेपरफुटीच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. यापूर्वी नीट आणि एमपीएससी परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “तरुणांनी दरवर्षी आंदोलनच करायचे का? त्यांच्या स्वप्नांचे काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (TET Paper Leak)

दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून पेपरफुटीच्या या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here