Home महाराष्ट्र नाशिक Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘मिशन ग्रीन मान्सून’चा शुभारंभ,लोकसहभागातून हरित नाशिक साकारणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘मिशन ग्रीन मान्सून’चा शुभारंभ,लोकसहभागातून हरित नाशिक साकारणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
Nashik :  मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘मिशन ग्रीन मान्सून’चा शुभारंभ,लोकसहभागातून हरित नाशिक साकारणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Nashik : प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ २८ जून रोजी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानात प्रत्येक नाशिककराने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘मिशन ग्रीन मान्सून’ (‘Mission Green Monsoon’) अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, वनाधिकारी रणदिवे, मनपा उद्यान निरीक्षक विवेक भदाणे, वृक्षमित्र शेखर गायकवाड, चंदू पाटील, जगबीर सिंग, मनोज साठे, वैभव देशमुख, मनीष बाविस्कर, भारती जाधव, राम खुर्दळ, भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, सागर बैरागी, गौरव देशमुख, सोनल दगडे यांच्यासह शहरातील पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/27/nashik-mahavitaran-to-bear-the-cost-of-new-electricity-connections-for-industries/

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या देवराई (फाशीचा डोंगर) या ठिकाणी वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्यात आली असून आजही या परिसरात वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. २८ जून २०२६ रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘मिशन ग्रीन मान्सून’ अंतर्गत या ठिकाणी दोन हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे.

त्यासोबतच शिंदे ग्रामपंचायतीचे सरपंच बाजीराव जाधव यांनी देखील दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, २८ जून रोजी ग्रामपंचायत परिसरात दोन हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध भागांतून वृक्ष लागवडीसाठी अनेक नागरिकांनी मागणी केली असून, या जागांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत रोपे पुरवण्यात येणार आहेत. अशाप्रकारे येत्या रविवारी सुरू होणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या माध्यमातून सुमारे पाच ते सहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/06/27/online-betting-worth-crores-in-the-name-of-fifa-world-cup/

“महानगरपालिका क्षेत्रात व परिसरात सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी योग्य जागा उपलब्ध असेल आणि अशा परिसरातून नागरिकांनी मागणी केली, तर त्यांना झाडे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याकरिता दिलेला क्यु आर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपली मागणी नोंदवायची आहे. जागा योग्य असल्यास प्रशासनामार्फत त्या ठिकाणी मोफत झाडे पुरवली जातील. तरी या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन ‘हरित नाशिक’ चळवळीला बळ द्यावे. असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here